लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे तब्बल ५४ दिवसांपासून एसटी बसची चाके फिरलीच नाहीत. आता शुक्रवारपासून जिल्हांतर्गत १२५ बसेस धावणार असल्याने ग्रामीण प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोेखण्यासाठी पहिल्या टप्प्यात २२ मार्च ते १४ एप्रिल, नंतर १४ एप्रिल ते ३० एप्रिल, पुढे ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला शासनाच्या आदेशान्वये मुदतवाढ देण्यात आली. लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे तब्बल ५४ दिवस बाजारपेठ ठप्प होती. या काळात केवळ किराणा दुकाने आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील बसगाड्याही २२ मार्च ते ५ मे जागीच थांबल्या होत्या. ६ ते १० मे दरम्यान काही बसफेऱ्या सोडण्यात आल्या.नंतर पुन्हा ११ ते २१ मे या कालावधीत बसगाड्या बंद होत्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला १० कोटींवर वाहतूक उत्पन्नाला मुकावे लागले. लॉकडाऊनमध्ये शिथिलला आणल्याने शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील रस्त्यांवरून १२५ बसेस धावणार आहेत.त्या-त्या ठिकाणची प्रवासी संख्या गृहीत धरून हे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी लोकमतशी बोलताना दिली. वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे पाच आगार आहेत.वर्धा विभागाच्या ताफ्यात २६७ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आगामी काळात शासन प्रशासनाच्या पुढील निर्देशानंतर जिल्हांतर्गत सर्वच बसफेºया सुरू करण्याचाही वर्धा विभागाचा मान आहे.वाहतूक उत्पन्नाला १० कोटींवर फटकावर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे पाच आगार असून एकूण २६७ बसगाड्या या आगारांमध्ये आहे. वर्धा विभागाचे प्रतिदिवस सरासरी उत्पन्न २० लाख रुपये आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५४ दिवसांपासून एसटी बससेवा ठप्प असल्याने वर्धा विभागाला वाहतुक उत्पन्नापोटी १० कोटी रुपयांवर फटका बसला आहे.५४ दिवस थांबली एसटीची चाकेकोरोना विषाणूने देशभरासह राज्यात थैमान घातल्याने विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्याने वर्धा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी तब्बल ५४ दिवस जागीच थांबली.प्रवासी संख्या लक्षात घेऊन वर्धा विभागाकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी संख्या असेल तेथे या बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.-चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, वर्धा विभाग.
आजपासून जिल्हांतर्गत धावणार १२५ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला १० कोटींवर वाहतूक उत्पन्नाला मुकावे लागले. लॉकडाऊनमध्ये शिथिलला आणल्याने शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील रस्त्यांवरून १२५ बसेस धावणार आहेत.
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : प्रवासीसंख्येनुरूप विभागाचे नियोजन