शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मराठी शाळांकडे १,२९४ विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 6:00 AM

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्यावरच पालकांची नजर खिळली आहे.

ठळक मुद्देकॉन्व्हेंटची क्रेझ : पटसंख्या घसरल्याने शिक्षण विभागावर अतिरिक्त शिक्षकांचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मिळणारे प्रोत्साहन आणि मराठी शाळांच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मराठी शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होऊन शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पटसंख्या १ हजार २९४ ने कमी झाल्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्यावरच पालकांची नजर खिळली आहे. परिणामी खिशाला झळ सोसत पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आपला मोर्चा वळविला आहे. याचाच फटका जिल्हा परिषदसह खासगी मराठी शाळांना बसला आहे. विशेषत: जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांनी पदमोड करुन पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. अनेक शाळा आयएसओ मानांक न प्राप्त असून आंतरराष्ट्रीय शाळांकेड कूच केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही लाजवेल अशा काही मराठी शाळा असतानाही पालकांच्या कॉन्व्हेंट क्रेझमुळे या शाळांची पटसंख्या घसरतच आहे. सन २०१७-१८ मध्ये संचमान्यतेनुसार आठही तालुक्यातील प्राथमिक विभागातील पटसंख्या ३८ हजार ८९९ इतकी होती. ती २०१८-१९ मध्ये ३८ हजार ०४ इतकी झाली तर माध्यमिकची पटसंख्या ८ हजार ८९८ वरुन ८ हजार ४९९ वर आल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागातील पटसंख्या १ हजार २९४ ने कमी झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांना अच्छे दिन आणण्याकरिता शासन स्तरावरुनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.शिक्षकांवरही गंडांतरजिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील २०१७-१८ मधील पटसंख्या ४७ हजार ७९७ असल्याने मुख्याध्यापक, सहाय्यक मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षक यासह इतर शिक्षकांची एकूण २ हजार ९३० पदे मंजूर होती. त्यापैकी २ हजार ७९५ पदे भरली गेली होती तर १७८ पदे रिक्त आणि ४३ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.तर २०१८-१९ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पटसंख्या ४५ हजार ५०३ वरच आली. त्यामुळे याचा परिणाम शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या पदावरही झाला आहे. पटसंख्ये अभावी यावर्षीकरिता २ हजार ८९८ पदांना मजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ८८० पदावर कर्मचारी कार्यरत असून १०९ पदे रिक्त आहे. त्यामुळे तब्बल ९१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे.

टॅग्स :Schoolशाळा