शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वीज वितरणचा १३० जणांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:47 PM

विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हे : ११ महिन्यांत ५० लाखांची विद्युत चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे. सोबतच वीज चोरी प्रकरणातील सात जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यापैकी ४ जणांनी रक्कम भरल्याने आता तिघांवरच कारवाई सुरु आहे.घर तिथे वीज असेच समिकरण सध्या पहायला मिळत असल्याने विजेची उधळपट्टीही मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्धा शहर उपविभागातही मोठ्या प्रमाणात विद्यूत वितरणचे ग्राहक असून शहरातही घरघुती मीटरवरुन व्यावसायीक वापर, मीटरमध्ये अदलाबदल करुन वीज चोरी किंवा पोलवर हुक टाकून वीजचोरी केल्या जाते. यात सर्वसामान्यापासून तर धनदांडग्याचाही समावेश आहे. या वीजचोरीमुळे विद्युत वितरण कंपनीला नुकसान सहन करावे लागतात. त्यामुळे वितरणकडे असलेल्या प्रणालीव्दारे विद्युत चोरीची माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर कारवाईचा बडगा उगारल्या जातात. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांनी सहायक अभियंत्यासह शहरात वीज चोरी पकडण्यासाठी मोहीम राबविली. एप्रील २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत १३० ग्राहकांनी ३ लाख ५२ हजार १४० युनिटची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वावर कारवाई करीत त्यांच्याकडून चोरी केलेल्या युनिटबाबत ४४ लाख २३ हजार ८५ रुपये व तडजोड रक्कम ५ लाख ५९ हजार रुपये असे एकूण ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली केली आहे.मीटरमधूनच वीज चोरी करण्याचे प्रमाण अधिकशहरात घरगुती मीटरवरुन ४४ जणांनी व्यावसायिक वापर करीत १९ लाख ८८ हजार ५५० रुपयाच्या ८४ हजार २४५ युनिटची चोरी केली. तसेच मीटरमध्ये हेराफेरी करुन ६९ ग्राहकांनी २ लाख ५३ हजार ८ युनिट वीज चोरली आहे. त्यांच्याकडून २३ लाख १३ हजार ५४५ रुपयांसह ५ लाख २१ हजार तडजोड रक्कम वसूल केली. १७ ग्राहकांनी हुक टाकून १४ हजार ८८७ युनिट वीज चोरल्याने त्यांच्याकडून १ लाख २० हजार ९९० रुपयांसह ३८ हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल केली. या आकडेवारीवरून मीटरमध्ये हेराफेरी करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.विद्युत मीटरचा तुटवडाही कारणीभूतग्राहकांने डिमांड भरून विद्युत मीटरकरिता अर्ज केला असता त्याला नियोजित कालावधीत मीटर पुरविले जात नाही. विद्युत वितरण कंपनीकडे मीटरचा तुटवडा असल्याने ग्राहकांना वेळेत मीटर मिळत नाही. त्यामुळे काही कर्मचारीच ग्राहकांना डायरेक्ट लाईन घेण्याचा सल्ला देतात. तर काही कर्मचारीच विद्युत मीटरमध्ये हेराफेरी करुन देत वीज चोरीचा मार्ग दाखवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्राहकांना काही कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्यानेच वीजचोरीचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: बड्याहस्तींना अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद मिळत आहे. कुणी तक्रार केल्यावरच अधिकारी जागे होतात आणि कारवाईचा दिखावा करीत आपले हितसंबंध जोपासत असल्याचेही निदर्शनास येते.विद्युत चोरीचा मोठा फटका बसत असल्याने अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनात सर्व उपविभागात मोहीम राबविली जाते. वर्धा शहर उपविभागातही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत एप्रील २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत १३० ग्राहकांनी ३ लाख ५२ हजार १४० युनिटची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुध्द कारवाई करीत एकूण देयकाची रक्कम व तडजोड रक्कम वसुल केली आहे. यापुढेही ही मोहीम सुरु राहणार आहे.- नरेश पारधी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वर्धा शहर उपविभाग.

टॅग्स :electricityवीज