शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सेवाग्राम विकास आराखड्यातील १४५ कोटींना मान्यता

By admin | Published: April 09, 2017 12:28 AM

सेवाग्राम विकास आराखड्यासाठी २६६ कोटी ५३ लाख ७५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे.

जिल्हाधिकारी : कार्यकारी समितीची बैठक वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यासाठी २६६ कोटी ५३ लाख ७५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये निधीला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील ३४ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करुन कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सेवाग्राम विकास आराखड्या संबंधित आयोजित जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत दिली. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार अराडकर, अरुण काळे, पी.पी. पांडे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव जाधव, मगन संग्रहालयाच्या विभा गुप्ता, नई तालिमच्या सुषमा शर्मा, प्रभाकर पुसदकर, एमगिरीच्या प्रगती गोखे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मुन, नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वाघमळे, सेवाग्रामच्या सरंपच रोशना जामलेकर यांची उपस्थिती होती. आश्रम परिसरातील सभागृह बांधकाम, यात्री निवास येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, आश्रम व यात्रीनिवासच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, पवनार येथील आश्रमचे सुशोभिकरण व बांधकाम, यात्रीनिवास येथील सुविधा आदी कामांचा समावेश आहे. यावेळी नवाल म्हणाले, ग्रामपंचायतींनी रस्त्यावरील अतिक्रमीत हॉकर्सला रस्त्यापासून काही अंतरावर जागा उपलब्ध करुन दुकाने बांधुन द्यावी. यामुळे रस्त्याचे सौंदर्यीकरण करुन पादचारी मार्गाचे बांधकाम करणे सोईचे होईल. पवनार ते सेवाग्राम रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून सेवाग्राम ते गांधी चौकापर्यंत सौंदर्यीकरण करुन पादचारी मार्ग तयार करण्यात येईल. सेवाग्राम येथील अण्णा तलावाचे सुशोभिकरण करणार असल्याचे नवाल यांनी सांगितले. सौंदर्यीकरण व पादचारी मार्ग तयार करण्याची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)