लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : विषयुक्त चारा खाल्ल्याने तब्बल १५ गार्इंचा मृत्यू झाला. तर काही गार्इंची प्रकृती गंभीर आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.येथील पाचपावली पांदण शिवारात गार्इंचा कळप नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेला होता. दरम्यान विषयुक्त चारा गार्इंनी खाल्ला. परिणामी, गार्इंची प्रकृती खालवल्याने पशुपालकाची तारांबळ उडाली. बघता-बघता तब्बल १५ गार्इंचा मृत्यू झाला. तर काही गार्इंची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून प्रकृती बिघडलेल्या गार्इंवर उपचार करण्यास सूरू केले. गुराखी मोरेश्वर मुरके याने या गाई चारण्यासाठी नेल्या होत्या. दुर्गे यांनी गोंचचवळीच्या शेतात गाई चरण्यासाठी बोलावल्यानुसार गुराख्याने २२ गार्इंसह वासरे येथे चरण्यासाठी नेली होती. जनावरे शेतात चरत असताना अचानक खाली कोसळण्यास सुरूवात झाल्याने गुराख्याची भंबेरी उडाली. त्याने तातडीने शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय गाठून डॉक्टरांसह ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. तर सचिन पाचघरे, राहुल उंभरकर, किरण डहाके, नीतेश राऊत हे तातडीने गुराख्याच्या मदतीला धावले. त्यांनी गार्इंना पाणी पाजले. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाºयांना सहकार्य केले. मुकिंदा मांडळे यांच्या मालकीच्या चार गाई, संजय चौधरी एक, गोलू शेंदरे एक, मोरेश्वर मुरके एक, पिंटू मेहरकुरे एक, सुधीर इंगळे यांच्या मालकीच्या पाच गार्इंचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित गार्इंची प्रकृती चिंताजणक आहे. माहिती मिळाल्यावर तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवी मनवर, जमादार प्रमोद हरणखेडे, परवेज खान, मनोज वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
विषयुक्त चारा खाल्ल्याने १५ गार्इंचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:09 PM
विषयुक्त चारा खाल्ल्याने तब्बल १५ गार्इंचा मृत्यू झाला. तर काही गार्इंची प्रकृती गंभीर आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. येथील पाचपावली पांदण शिवारात गार्इंचा कळप नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेला होता.
ठळक मुद्देसंडे अँकर । काही गार्इंची प्रकृती गंभीर, नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षा