शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त

By महेश सायखेडे | Published: September 05, 2022 6:48 PM

सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.

वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाते. परंतु, संबंधित लाभार्थ्यांना केंद्राच्या या योजनेचा यापुढेही लाभ घेण्यासाठी वेळीच केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या केवायसीचा टक्का ५२ वर स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाच्या अडचणीत भर पडली होती.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वेळीच केवायसी करता यावी, या हेतूने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गेले दोन दिवस विशेष केवायसी शिबिर घेण्यात आले. याच शिबिरांमध्ये अवघ्या ४८ तासांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली. त्यामुळे हे विशेष शिबिर पीएम किसानच्या केवायसीचा टक्का वाढविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.७ सप्टेंबर, केवायसीची डेडलाइन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करता यावी, या हेतूने शासनाने केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन तसेच घरबसल्या मोबाइलचा वापर करून केवायसी करता येणार आहे.६,००० बंद होण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून सहा हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. परंतु, वेळीच केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या या अर्थसहाय्यापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळीच केवायसी करणे गरजेचे आहे.१,४६,३४३ लाभार्थी

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकूण १ लाख ४६ हजार ३४३ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९० हजार ८७० लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे, तर ५५ हजार ४७३ लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसल्याचे वास्तव आहे.वर्धा तालुक्याचे काम ढेपाळलेलेच

मागील दोन दिवसात विशेष शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली असली तरी वर्धा तालुक्यात पाहिजे तसे काम झाले नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन दिवसात वर्धा तालुक्यात केवळ १ हजार ६१३ शेतकऱ्यांनीच केवायसी केली असून, इतर तालुक्यांच्या तुलनेत वर्धा तालुका हा पीएम किसान केवायसीच्या कामात मागेच आहे. वर्धा तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१ टक्केच काम झाल्याचे वास्तव आहे.केवायसी पूर्णची तालुकानिहाय स्थितीआर्वी : ११,८८२आष्टी : ७,१२८देवळी : १२,७८४हिंगणघाट : १४,२९५कारंजा : १३,५५५समुद्रपूर : ११,८७६सेलू : ९,९६२वर्धा : ९,३८८

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा