आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ जाहीर करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या ६८ हजार आहे. यातील ९० टक्के शेतकरी महावितरणची देयके भरीत नाहीत. महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि कृषी पंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा केला जातोे त्यापैकी ८५% रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील ३ वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलं नाही. पण थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ८५२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ६७. ७६ लाख रुपये, आष्टी उपविभागात १२९० कृषी पम्प वीज ग्राहकांनी १८.८४ लाख रुपये, कारंजा उपविभागात १५४३ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ५४ लाख रुपये, खरंगाना ( ग्रामीण) उपविभागात ६१५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी २० लाख रुपये, पुलगाव (शहर) उपविभागात ९४२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १४ हजार रुपये, हिंगणघाट (शहर) उपविभागात ५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ११ हजार रुपये, हिंगणघाट उपविभागातील ३६९४ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ४ कोटी २२ लाख रुपये , समुद्रपूर उपविभातील २,२२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपये, देवळी उपविभातील १५२९ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १ लक्ष रुपये, सेलू उपविभातील ८२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ९३ लाख रुपये, वर्धा उपविभागातील २२७१ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी ठेवली आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांस ३०,००० रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत ५ समान हप्त्यात ही रक्कम भरावी लागणार असून सोबत चालू देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. ३०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्यास १० सामान हप्ते मिळणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी सादर योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 3:17 PM
जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.
ठळक मुद्देकोट्यवधींच्या रकमेची थकबाकी