लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या रकमेतून २ लाख १२ हजार ९५२ शेतकºयांना लाभ मिळणार आहे.अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली असून ती दोन ते तीन दिवसात लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती करण्याची जबाबदारी तहसीलदारांना देण्यात आली असून त्यांच्यापर्यंत रक्कम पोहोचली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. ही रक्कम एकाच वेळी सर्वच शेतकºयांच्या खात्यात जमा करणे सुलभ व्हावे याकरिता तहसीलदारांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आले आहे.जिल्ह्यात गत खरीप हंगामात एकूण २ लाख १३ हजार १२२ शेतकºयांनी २ लाख ५४ हजार ५२६.३८ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. यात झालेल्या बोंडअळीच्या हल्ल्यात सर्व शेतकºयांना फटका बसल्याचे दिसून आले. यामुळे शासनाच्या सुचनेमुळे कृषी विभाग व महसूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना जिरायती व बागायती असे वर्गीकरण करून मदत देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ हेक्टरवर पीक मदतीकरिता पात्र ठरले. यामुळे २ लाख १२ हजार ९५२ शेतकºयांना मदत जाहीर झाली आहे.आधार संलग्न बँक खाते गरजेचेबोंडअळीची मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्याचे खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास ओळख पटेल अशा कागदपत्रांची पडताळणी करून शेतकºयांना ही मदत देण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या आहे. यामुळे शासनाकडून शेतकºयांना मदत मिळण्याकरिता त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसत आहे.खरीप हंगामापूर्वी मदत मिळण्याची अपेक्षाखरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत असताना कर्जमाफीत उद्भवलेल्या थकीत व्याजामुळे नवे कर्ज अडकले आहे. यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या संकटाच्या काळात ही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार होईल, असे बोलले जात आहे. मात्र शासनाच्या इतर योजनेप्रमाणे यातही वेळ गेल्यावर मदत तर येणार नाही ना अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे.जिल्ह्याला आवश्यक रक्कम एकाच टप्प्यातबोंडअळीची मदत देताना शासनाने त्या मदतीचे तीन टप्पे करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे जिल्ह्यात तीन टप्प्यात रक्कम येईल, असे वाटत असताना शासनाने एकाच टप्प्यात ही मदत दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीकरिता वाट पाहण्याची गरज पडणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.सर्वच शेतकऱ्यांना ६,८०० रुपयांप्रमाणे मदतबोंडअळीच्या नुकसानीची मदत देताना शासनाने जिरायती व बागायती असे शेतजमिनीचे वर्गीकरण केले होते. त्यानुसार जिरायती शेती असलेल्या शेतकºयांना हेक्टरी ६ हजार ८०० रूपये तर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती. वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात एकाही शेतकºयाकडे बागायती शेती नसल्याचे म्हणत सर्वच शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे सरसकट मदत जाहीर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांनाही कोरडवाहू शेतकºयाप्रमाणे लाभ मिळाल्याचे दिसते.
बोंडअळीच्या नुकसानीचे १५३.७८ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:45 PM
गत खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या रकमेतून २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
ठळक मुद्दे२ लाख १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ