वर्धा : वर्ध्यात आज सतराव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाला शिवाजी चौकातून सांस्कृतिक विचार यात्रा काढून सुरुवात झाली.
या यात्रेत शालेय विद्यार्थ्यांसह दलित आदिवासी विद्रोही सांस्कृतिक परंपरेच्या विविध संघटनांचा सहभाग आहे. नंदुरबार येथील आदिवासी लोककला नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. संमेलन अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे कमी आणि शासनाचे जास्त असल्याची टीका यावेळी केली.