शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

१८,६०० झाडे होरपळली

By admin | Published: May 01, 2017 12:29 AM

तालुक्यात सामाजिक वनीकरणने १८ हजार ६०० रोपटी लावली. शासनाच्या बिहार पॅटर्ननुसार त्यांचे संगोपन केले.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : सामाजिक वनीकरणच्या प्रयत्नांवर पाणी प्रफुल्ल लुंगे   सेलू तालुक्यात सामाजिक वनीकरणने १८ हजार ६०० रोपटी लावली. शासनाच्या बिहार पॅटर्ननुसार त्यांचे संगोपन केले. नियमानुसार तीन वर्षांनंतर जोपासलेली झाडे ग्रामपंचायतीच्या हवाली केली. ग्रामपंचायतींनी ती झाडे हस्तांतरीत केली; मात्र ती कागदावरच असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने धुरे पेटविण्याच्या प्रकारात ही झाडे होरपळत असल्याचे समोर आले. सामाजिक वनीकरण विभागाने सेलू तालुक्यातील जवळपास १८ रस्त्यांच्या दुतर्फा १८ हजार ६०० झाडे लावली. यापैकी सन २०१२ च्या पावसाळ्यात १० हजार, २०१३ मध्ये ४ हजार व २०१४ ला ४ हजार ६०० रोपे लावली. तत्कालीन लागवड अधिकारी विकास गभणे यांनी वनरक्षक आर.टी. बहादुरे, सहायक लागवड अधिकारी आर.जे. फुले, सहकारी एन.एस. निखाते यांच्या मदतीने झाडांचे संगोपन केले. बिहार पॅटर्ननुसार २०० झाडांमागे एक व्यक्ती या प्रमाणे कामगार ठेवले होते. संगोपनानंतर केले ग्रा.पं.कडे हस्तांतरीत सेलू : रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ही झाडे रस्ता ज्या ग्रामपंचायत हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीला शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१७ ला हस्तांतरित केले. यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांना या झाडांची निगा राखण्याचे आदेश देण्यात आले. पण, ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाले. शेताचे धुरे पेटवितांना ही झाडे भस्मसात झाली. तालुक्यातील वडगाव(जंगली) ते हिंगणी, शिवणगाव, कोटंबा ते धपकी व सेलू ते सुकळी(स्टे.) या रस्त्याची झाडे बघितली असता वाढलेली झाडे जाळल्या गेल्याचे दिसून आले. इतरही रस्त्याचे हाल कमी जास्त प्रमाणात असेच असण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१४ पर्यंत लावलेली १८ हजार ६०० झाडे ग्रामपंचपायतींना हस्तांतरीत झाली आहे. २०१५ ला सामाजिक वनीकरण ने ७ हजार २००, २०१६ ला ५ हजार ६०० व झाडे लावून त्याचे संगोपन केले. येत्या पावसाळ्यात २ हजार ८०० झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. या झाडांचे संगोपन व देखभाल वनीकरणच करीत आहे. नव्याने आलेले लागवड अधिकारी आर. एस. दवंडे हेही तेवढ्याच जिद्दीने काम करताना पाहून अधिनस्त कर्मचारीही तन्मयतेनेच काम करताना दिसतात. आता ही वाढलेली झाडे ग्रामपंचायतीला द्यावी अथवा नाही, असा विचार होत आहे. तक्रार होताच कारवाई वर्धा : आकाशने वर्धेला परत आल्यावर वर्धा लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी शोधमोहीम राबविली. सदर मोहिमेदरम्यान एक तरुण वर्धा रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केली असता प्रारंभी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला ८ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, हवालदार किशोर दाभाडे, दिलीप बारंगे, अशोक हनवते, राहूल येवले, नितीन शेंडे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)