शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित

By admin | Published: June 25, 2017 12:54 AM

येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र त्यांना एका पेपरला

नागपूर विद्यापीठाचा कारभार : ‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल नापास लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र त्यांना एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय गोंदिया येथील द्वितीय वर्षाच्या कम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ४ सेमचा ‘इंट्रोडक्शन टू मेन फेम ’ या विषयाचा पेपर दिला. त्या पेपरला गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला. शुक्रवार (दि.२३) रोजी नागपूर विद्यापीठाने निकाल जाहीर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नापास दाखविल्याने त्या विद्यार्थ्यांना धडकी भरली. त्यांनी महाविद्यालय गाठले त्यांनी यासंदर्भात प्राचार्य व विभाग प्रमुखांसोबत बोलून यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला कळविण्याची विनंती केली. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासंदर्भात माहिती महाविद्यालयातर्फे नागपूर विद्यापीठाला पाठविण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठात बसलेल्या लिपीक वर्गाच्या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना गैरहजर दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला आहे. निकाल शुक्रवारी आल्यामुळे सर्व विद्यार्थी शनिवारी महाविद्यालयात पोहचले. परंतु महिन्याचा चवथा शनिवार असल्याने विद्यापीठ बंद, रविवारची सुट्टी, पुन्हा सोमवारी रमजान ईद असल्यामुळे सलग तिन सुट्या आल्याने आपण वेळीच आक्षेप कसा घेणार या संभ्रमात विद्यार्थी होते. महाविद्यालयाने या बाबीची दखत घेत मंगळवारी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांचा निकाल बरोबर करण्यासाठी त्यांच्या सर्व हजेरी विद्यापीठात पोहोचविणार असल्याचे सांगण्यात आले. गैरहजर दाखविलेले विद्यार्थी काम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या १९ विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने गैरहजर दाखविले. त्यात प्रणय बावणकर, हरिष बहेकार, हिमांशू मेश्राम, करण राजभार, कार्तिक यादव, मनिष उके, प्रजय बागडे, प्रखर दिक्षीत, प्रणय भगत, शंकर चिमाणी, श्रेयस ईटानकर, शुभम शरणागत, सेल्व्हन्स ऐंथोनी, रजत शेंदरे, शुभम घोष, सुभाशू बावणथडे, उदीत खोटेले, विपीनकुमार पटले, यश चांदवानी अशी सदर विद्यार्थ्यांची नावे आहेत.