शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

जिल्ह्यातील २00 फॉगिंग मशीन नादुरुस्त

By admin | Published: May 08, 2014 2:08 AM

डासांचा उपद्रव कमी होण्यासाठी मशीनद्वारे धुरळणीची खरेदी करण्यात आली होती; परंतु मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या मशिनचा वापर होतांना दिसत नाही.

खरेदी व्यवहारावरच प्रश्नचिन्ह : दुरुस्तीचे प्रावधान नसल्याचे कारण पुढेडासांचा उपद्रव कमी होण्यासाठी मशीनद्वारे धुरळणीची खरेदी करण्यात आली होती; परंतु मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या मशिनचा वापर होतांना दिसत नाही. जिल्ह्यात एकूण २00 मशीन आल्या असून त्या नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुरूस्तीचे कुठलेही प्रावधान नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नादुरूस्त असलेल्या मशीन धुळखात पडून आहे.साचलेले सांडपाणी, तुंबलेली गटारे यामुळे डासांचा प्रादरुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच डेंग्यू, मलेरिया, टाईफाईडसारखे आजारही वाढू लागले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी फॉगिंग मशीनचा लाभ होऊ शकला असता. जिल्ह्यातील जवळपास २00 ग्रा.पं.ने २८ हजार रुपये प्रती मशीन या दराने मशीन खरेदी केल्या आहेत. यासाठी लागणारा जवळपास ५६ लक्ष रुपयांचा निधी तेराव्या वित्त आयोगातून वापरण्यात आला आहे. परंतु मशिन नादुरस्त असल्यामुळे शासनाला ५६ लक्ष रुपयांचा चूना लागल्याचे निर्दशनात येते. मशीनची कुठलीही तपासणी न करता, आंधळेपणाने सदर मशिन खरेदी करण्यात आल्या. त्या मशीनची कार्यक्षमता न तपासता खरेदी करण्यात कुणाला लाभ तर मिळणार नव्हता, हे तपासणे आता गरजेचे आहे. एक दोन मशीन नादुरुस्त असेल तर समजण्यासारखे आहे, परंतु जिल्ह्यात खरेदी केलेल्या सर्वच मशीनची सारखी परिस्थिती असेल तर या खरेदी व्यवहारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

■ आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. १३ व्या वित्त आयोगातून नियोजन करून ग्रा.पं.ने या फॉगिंग मशीनची खरेदी केली; परंतु त्यात सतत होत असलेल्या बिघाडामुळे व ती मशीन हाताळणारे कुशल कर्मचारी नसल्यामुळे त्या मशीन धूळखात आहेत. फॉगिंग मशीनचा वर्षभर वापर होत नसल्यामुळे ती तशीच राहते. तिचे व्यवस्थापन केल्यास बिघाड होणार नाही. परंतु ग्रामपंचायतस्तरावर मशीन हाताळणारे कुशल कारागिर नसल्याने हा बिघाड वारंवार होत आहे.- हेमंत देवतळेविस्तार अधिकारी, पं.स. वर्धा