लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत. याबाबत विकास भवन येथे बुधवारी पार पडलेल्या संवाद बैठकीत पाणीदार गावांचा संकल्प करण्यात आला.जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंद व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो स्मीता पाटील, जलनायक डॉ. सचिन पावडे, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक मंदार देशपांडे, अशोक बगाडे, माधव कोटस्थाने, डॉ. उल्हास जाजू, वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव, डॉ. संदीप इरटवार उपस्थित होते.मार्गदर्शन करताना स्मीता पाटील यांनी, पाणीदार गाव ते समृद्ध जीवन हा मार्ग जल चळवळीतून पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी लोक-सहभाग व लोकाभिमुख प्रशासनाच्या समन्वयाने शक्य असल्याचे सांगितले. देशपांडे यांनी पाणी फाऊंडेशनची भूमिका व दोन वर्षांतील वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणीदार कामगिरी व्यक्त केली. आगामी वॉटर कप स्पर्धेकरिता सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बगाडे तथा तालुका समन्वयक अमित दळवी, दीपक तपासे, भूषण कडू, शिल्पा अडसड यांनी आपापल्या तालुक्यातील कामांची माहिती दिली. सामाजिक संघटनाकडून कोणते काम अपेक्षित आहे, यावर चर्चा केली. माधव कोटस्थाने, डॉ. जाजू यासह संघटनातर्फे योगेंद्र फत्तेपुरीया, अनिल फरसोले, सुभाष पाटणकर, नितेश कराळे, मुरलीधर बेलखोडे, दीपक सावरकर, हर्षवर्धन, विशाल घाडगे यांनी सूचना केल्या. गुरव यांनी हेल्मेट वापराचे आवाहन केले. संचालन अमोल गाढवकर यांनी केले तर आभार श्याम भेंडे यांनी मानले. बैठकीला ११० संघटना उपस्थित होत्या.संघटनांचा सक्रीय सहभाग गरजेचाआगामी वॉटर कप स्पर्धेत सर्व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. सेलू, देवळी, आर्वी व कारंजा तालुक्यातील एकूण २१७ गावांत महाश्रमदान, यंत्र पुरवठा, आर्थिक सहकार्य, तांत्रिक मार्गदर्शन, अन्नदान, वस्त्रदान, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय मदत या माध्यमातून संघटनांनी सहकार्य करावे, असे प्रास्ताविकातून डॉ. सचिन पावडे यांनी सुचविले.
२१७ गावांत करणार ११० संघटना महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 10:27 PM
पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत.
ठळक मुद्देवॉटर कपसाठी संवाद बैठक : प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच व पाणी फाऊंडेशनचा उपक्रम