लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यातील एकूण ८ हजार ६७ मजूर अडकले. याच मजुरांपैकी २२० मजूर रविवारी भारत मातेचा जयघोष करीत त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना झाले. मूळ गावी जात असलेल्या या मजुरांनी निरोप घेताना वर्धा जिल्हा प्रशासनासह त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकेल्या मजुरांपैकी लखनऊच्या दिशेने कोण जाण्यास इच्छुक असल्याची माहिती सुरूवातीला वर्धा जिल्हा प्रशासनाने गोळा केली. त्यानंतर या २२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.मजुरांना मुळ गावी रवाना करताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री, विजय कोंबे, जय हिंद फाऊंडेशनचे बिपीन मोघे आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नागपूरकडे जाण्यासाठी बस सुरू होताच स्वगावी जाणाºया मजुरांनी भारत माता की जय... यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी के कर्मभूमी की जय, जय वर्धा असा जयघोष केला. मजुरांकडून होणाºया जयघोषामुळे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी भावुक झाले होते.अधीक्षकांनी पटवून दिले सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्ववर्धा येथून बसचा प्रवास करून नागपूर आणि नागपूर येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडीने लखनऊ येथे रवाना झालेल्या मजुरांशी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनीही संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी स्वगावी जात असलेल्या मजुरांना कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे कसे प्रभावी शस्त्र आहे हे सोप्या शब्दात पटवून दिले.सामाजिक संघटनांनी दिला पॉकेटमनीवर्धा जिल्ह्यात अडकलेल्या २२० मजुरांना रविवारी त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. या निरोपादरम्यान काही सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू मजुरांना पॉकेटमनी देऊन त्यांच्या मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच या उपक्रमामुळे ‘अतिथी देवो भव’चा उद्देशच सामाजिक संघटनांनी जोपासला.जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवादमजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यापूर्वी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मजुरांशी संवाद साधला. मजुरांनी त्यांच्या मुळ गावी गेल्यावर तसेच प्रवासादरम्यान काय दक्षता घ्यावी याची माहिती यावेळी त्यांनी मजुरांना दिली. शिवाय कोरोनावर विजय मिळाल्यावर पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात या असे आवाहन करीत मजुरांचे मनोधैर्य वाढविले.तीन संस्थांनी केली बसची व्यवस्थारविवारी २२० मजुरांना लखनऊच्या दिशेने त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. हे मजूर नागपूर येथून सुटणाºया विशेष प्रवासी रेल्वे गाडीने नागपूर ते लखनऊ असा प्रवास करणार असले तरी वर्धा ते नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी उत्तम गलवा कंपनी, जय महाकाली शिक्षण संस्था व स्कूल आॅफ स्कॉलरच्यावतीने नि:शुल्क बसेसचा पुरवठा करण्यात आला होता.
भारतमातेचा जयघोष करीत २२० मजूर स्वगावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 5:00 AM
२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.
ठळक मुद्देनिरोप घेतेवेळी व्यक्त केली कृतज्ञता : विशेष रेल्वेगाडीने गाठणार लखनऊ