लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी पोलिसांनी वायगाव (निपाणी) येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी पाच वाजता नाकेबंदी करुन कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या २३ गायींचे प्राण वाचविले. गायींची वाहतूक करणारे दोन मालवाहू वाहने जप्त केली असून या सर्व गायी सर्वोदय गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पढेगाव, यांच्याकडे सोपविण्यात आल्या.हिंगणघाटकडून वायगाव (नि.) चौरस्ता मार्गे पुलगाकडे दोन मालवाहूत गायी कोंबून नेल्या जात असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वायगाव चौरस्त्यावर नाकेबंदी करुन मालवाहू वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकांनी पोलिसांना चकमा देत पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर दोन्ही वाहनांना पकडण्यात यश आले.पण, आरोपींनी वाहने रस्त्यावरच उभी करुन पळ काढला. पोलिसांनी एम.एच ०६ बीजी ४१७८ आणि एम.एच २७ एक्स ६३९२ क्रमांकाची दोन्ही वाहने जप्त केली असून त्यामध्ये कोंबलेल्या २३ गायींना बाहेर काढले. तेव्हा त्यातील एक गाय मृतावस्थेत आढळून आली. पोसिलांनी पंचनामा करुन सर्व गायी सर्वोदय गोशाळा, पढेगाव येथे पाठविल्या. यातील बºयाच गायी जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोशाळेत उपचार सुरु केले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन मालवाहू वाहनासह ९ लाख १९ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
कत्तलखान्याकडे जाणाऱ्या २३ गायींची केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 9:55 PM
देवळी पोलिसांनी वायगाव (निपाणी) येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी पाच वाजता नाकेबंदी करुन कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या २३ गायींचे प्राण वाचविले. गायींची वाहतूक करणारे दोन मालवाहू वाहने जप्त केली असून या सर्व गायी सर्वोदय गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पढेगाव, यांच्याकडे सोपविण्यात आल्या.
ठळक मुद्देदेवळी पोलिसांची कारवाई : दोन वाहने जप्त