वर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात २३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह कोसळधार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १०५.५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्या आत तर १४.२५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात कुठे किती शेतपिकाचे नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती सध्या कृषी आणि महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जाणून घेत आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत एकूण तीन जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन बैल तर एका गोऱ्हाचा समावेश आहे. देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक बैलाचा तर हिंगणघाट तालुक्यात गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.कुठल्या तालुक्यात किती घरांचे नुकसान?देवळी : १३सेलू : ०२कारंजा : ०८