शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

एकराला २५ किलो सोयाबीन, मळणीचा खर्च द्यायचा कसा?, शेतकऱ्यांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 13:04 IST

रोगाच्या प्रादुर्भावाने तोंडचा घास हिरावला

सुधीर खडसे

समुद्रपूर (वर्धा) : यावर्षी सर्वप्रथम पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून, या परिसरातील मांडगावमध्ये सोयाबीनला एकरी २५ किलो उतारा आल्यामुळे शेतकऱ्यांना मळणीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे इतक्या कमी उत्पादनात शेतकरी जगणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता यावा म्हणून सोयाबीन हे बोनस पीक समजले जाते. दिवाळीपूर्वी हे पीक घरी येत असून, यातून मिळणाऱ्या पैशांतून शेतकरी दिवाळी साजरी करतो. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ५ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये १ लाख २६ हजार हेक्टरवर सोयाबीन होते. त्यात आठही तालुक्यांत सर्वाधिक २४ हजार ४१४ हेक्टरवर एकट्या समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली.

सुरुवातीला आणि सोयाबीन फुलावर असताना पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव होऊन शेंगा लागण्यापूर्वीच सोयाबीन करपायला लागले. काही सोयाबीनला शेंगा लागल्या; परंतु त्या पूर्णत: भरल्याच नाही. त्यामुळे आता मळणी केल्यानंतर उत्पादनात कमालीची घट झाली. तालुक्यातील मांडगाव शिवारात तर एकरी २५ किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे. अशीच साधारणत: परिस्थिती जिल्ह्यातील इतरही भागातील असून, शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

रबी हंगामाची तयारी कुठून करणार?

रबीच्या हंगामाची तयारी खरिपाच्या उत्पादनावर अवलंबून असते. परंतु, खरिपातच सोयाबीनने धोका दिल्याने त्यासाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. आता रबीकरिता शेताची मशागत आणि बी-बियाणांची तडजोड आणि पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे.

मी अल्पभूधारक शेतकरी असून, दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. याकरिता पैशांची तडजोड करुन शेती फुलविली. पण, आता मळणी केल्यानंतर दोन एकरात केवळ ५० किलो सोयाबीन झाल्याने खर्चही भरुन निघाला नाही. शासनाने एक रुपयात पीकविमा काढून दिला; परंतु अद्यापही पंचनामे झाले नाही.

- केशव तिमांडे, शेतकरी, मांडगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकFarmerशेतकरीwardha-acवर्धा