लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना वापर होत असल्याने विद्रृपिकरणात भर पडत आहे. आता शासनाने प्लास्टिक पूर्णत: बंद केल्याने शनिवारी न.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम राबविली. यात छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना मार्गदर्शनात्मक सूचना देत २५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. सोमवारपासून ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.वर्धा न.प. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे व प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी आर्वी नाका, बजाज चौक, धंतोली परिसरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविली. यात पालिका कर्मचाऱ्यांनी अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना माहिती दिली. या मोहिमेत व्यावसायिकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली नसली तरी २५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर पथकात न.प. आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, सतीश पडोळे, लंकेश गोंडे, स्रेहा मेश्राम, नवीन गोंदेकर आदींचा समावेश होता.सोमवारपासून दंड व फौजदारी कारवाईकमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आाली आहे; पण याकडे अनेक जण पाठ फिरवित त्याचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. जे लहान-मोठे व्यावसायिक तसेच नागरिक कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतील त्यांच्याविरुद्ध सोमवारपासून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले. यामुळे व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व ग्राहकांनाही सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमी जाडीच्या २५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:41 PM
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना वापर होत असल्याने विद्रृपिकरणात भर पडत आहे. आता शासनाने प्लास्टिक पूर्णत: बंद केल्याने शनिवारी न.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम राबविली.
ठळक मुद्देप्लास्टिकमुक्तीसाठी पालिका कर्मचारी रस्त्यावर : व्यावसायिकांना दिल्या सूचना