आॅनलाईन लोकमतवर्धा : ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहायचे त्याच बालवयात जिल्ह्यातील जि.प. च्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी व राष्ट्रपती भवनाला भेट देण्यास निघालेत. हे स्वप्न नाही तर वास्तव आहे.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासून मुल्यसंस्कार रूजविण्यासाठी उडान प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जि.प. शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद, नई तालीम सेवाग्राम यांच्या सहकार्यातून मागील वर्षीपासून सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षण हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व अभिव्यक्तीला चालना दिली जात आहे. शाळा, केंद्र, तालुका असे टप्पे पार करून २१ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय उडाण ही सामान्य ज्ञान परीक्षा नई तालीम सेवाग्राम येथे पार पडली. या परीक्षेत जिल्ह्यातील पाचवी ते नववीचे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या सहभागी विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्याप्रमाणे स्पर्धेत गुणवत्तेत चमकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानवारीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती भवनास भेटी देण्याची संधी प्राप्त झाली आहे. गुरूवार ७ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून हे चिमुकले रवाना होणार आहेत.
वर्ध्यातील २५ चिमुकले ७ डिसेंबरला निघणार दिल्ली वारीसाठी; राष्ट्रपती भवनाला देणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:56 PM
ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहायचे त्याच बालवयात जिल्ह्यातील जि.प. च्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी व राष्ट्रपती भवनाला भेट देण्यास निघालेत. हे स्वप्न नाही तर वास्तव आहे.
ठळक मुद्देउडान प्रकल्पांतर्गत कार्यक्रम