ठळक मुद्दे१५० किमी प्रवासाचा मनस्तापआत्महत्येची मानसिकताहमीभाव ३०५० रु. प्रति क्विंटल
अमोल सोटे। सुधीर खडसे।आॅनलाईन लोकमतवर्धा : दिवाळी साजरी व्हावी व कर्ज फेडता यावे म्हणून परसोडा येथील २५ शेतकरी २५० क्विंटल सोयाबीन घेऊन दिवाळीच्या दिवशी अमरावती येथे गेले; पण तेथील व्यापाºयांनी शेतकºयांना फक्त ८५० रुपये प्रती क्विंटल भाव देऊ केला. यात खर्चही निघत नसल्याने सोयाबीन परत आणावे लागले. हा प्रसंग कथन करताना शेतकºयांना अश्रू अनावर झाले होते. १५० किमीचा प्रवास व झालेला मनस्ताप आत्महत्येस प्रवृत्त करणारा ठरल्याचे ते सांगतात.परसोडा येथील विजय ठाकरे, गौरव गोरे, विशाल ठाकरे यांच्यासह गोरे कुटुंबातील शेतकरी मिळून २५ शेतकºयांनी अमरावती येथील बाजारात सोयाबीन विकायला नेले. यासाठी ५ हजार रुपयांचा एक मेटॅडोर याप्रमाणे १५ हजारांत तीन मेटॅडोर केले. दिवाळी असल्याने मुलांना कपडे घ्यायचे होते. यामुळे मोठ्या उमेदीने हे सर्व शेतकरी गेले होते. तेथील व्यापाºयांनी एकजुट करून ठेवल्याने डझनभर व्यापारी शेतकºयांना झुलवत होते. हसून टिंगल करीत होते. यामुळे शेतकºयांना डोळ्यात अश्रू अन् हृदयावर दगड ठेवून सर्व दु:ख पचवून परत यावे लागले.या प्रसंगामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. किमान हमीभाव ठरविण्याचे सौजन्य अधिकरी व शासन दाखवित नसल्याने असा प्रकार सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांतून उमटत आहेत.अचानक पाऊस आल्यामुळे सर्व नियोजन कोलमडले आहे. हक्काचे पिकही गेल्याने वर्षभर कुटुंब कसे चालवावे, उसनवारीचे पैसे कसे फेडावे ही चिंता सर्व शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. व्यापारी शेतकºयांच्या जीवावर उठले आहेत. आता २५० क्विंटल सोयाबीन उन्हात वाळवून विकावे लागणार आहे. त्यातही काय भाव मिळेल, हा प्रश्नच आहे. सोयाबीनचे अत्यल्प भाव ऐकून शेतकरी मात्र पुरता हादरला आहे.पावसाने कहर केला. मोठ्या मेहनतीने सोयाबीन काढून विकायला नेले. अमरावती येथील व्यापाºयांनी भाव पाडले. शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे आमच्यावर वाईट वेळ आली आहे.- विजय ठाकरे, शेतकरी, परसोडा.शेतकरी संघटनेकडून शेतकºयांना आशालोकांचे देणे, मजुरांची मजुरी देण्याकरिता अत्यंत घाईने सोयाबीन काढून बाजारात आणले; पण हमीभाव ३०५० रुपये असताना मातीमोल भावाने शेतकºयांना माल विकावा लगात आहे. या बाबीकडे शासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत आहे. पाऊस, वारा, वादळ आदी आस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला तर व्यापारीरूपी सुलतानी संकट जीवघेणे ठरत आहे.एका दशकापूर्वी शेतकºयांच्या समस्येवर शेतकरी संघटना तुटून पडत होती. समुद्रपूर-हिंगणघाट तालुक्यात संघटनेकडून ऐतिहासिक आंदोलने झाली. त्यामुळे शासनावर दबाव येऊन शेतकºयाला किमान हमीभाव मिळत होता; पण शेतकरी संघटना प्रणेते शरद जोशींचे निधन झाले. तेव्हापासून शेतकरी संघटनेत मरगळ आली आहे. जेथे सत्ता तेथे शेतकरी संघटना, असे समीरकण झाले आहे. समुद्रपूर नगर पंचायतमध्ये शेतकरी संघटना भाजपसोबत तर कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ व हिंगणघाट कृउबासमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता उपभोगत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी शेतकºयांच्या गंभीर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास येत आहे. असे असले तरी आजही त्यांना शेतकरी संघटनेकडून अपेक्षा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकात सत्ताधारी भाजपाने शेतकºयाला अनेक आश्वासने दिली; पण त्यांनीही शेतकºयांचा भ्रमनिरास केला. उलट शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.