लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.वर्धा शहरातील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी न.प. प्रशासनाच्यावतीने पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल केली जाते. सदर पाण्यावर शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. असे असले तरी वर्धा शहरातील काही जलवाहिनी इंग्रजकालीन तर काही सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्या जलवाहिनीत वेळोवेळी तांत्रिक बिघाड होतात. नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात होत असले तरी जुनी जलवाहिनी न.प. प्रशासनाच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे. सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत जलवाहिनी फुटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर तब्बल २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली. सदर लिकेजेस दुरूस्तीचे काम न.प. प्रशासनाने वर्ध्यातीच सेवा कस्ट्रक्शन नामक एजन्सीला दिले आहे.सदर कंत्राटदाराकडून दुरूस्तीचे साहित्य व मनुष्यबळ पुरवित दुरूस्तीचे काम पूर्ण केले जात असल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीच्या लिकेजेसचे वेळीच दुरूस्ती करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.तक्रारीची घेतली जातेय वेळीच दखलजलवाहिनीमध्ये दोष निर्माण होऊन पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार प्राप्त होताच न.प. प्रशासन सदर तक्रारीची दखल घेवून कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम पूर्ण करते.ऐरवी दोन दिवसात दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाते. मात्र, जलवाहिनीतील तांत्रिक दोष मोठा असल्यास त्याला जास्त वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.जलवाहिनीच्या लिकेजेसच्या दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम केले जाते. मागील चार महिन्यात सुमारे २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच तक्रारीची दखल घेवून दुरूस्ती केले जाते. वेळीच दुरूस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.- नीलेश नंदनवार, अभियंता, न.प. पाणी पुरवठा, वर्धा.
चार महिन्यांत २६२ लिकेजेसची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:04 PM
शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.
ठळक मुद्देन.प.ला लाखोंचा भुर्दंड : जुनी जलवाहिनी वाढवतेय डोकेदुखी