लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची पाणी पातळी २८३.३२ दलघमी झाल्याने या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले आहेत. या धरणातून ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सकर्ततेचा इशारा देण्यात आला आहे.सततच्या पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, या जलाशयातील पाणी सोडण्याचा निर्णय घेत त्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले असून ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वर्धा नदीत होत आहे. परिणामी वर्धा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी (ब.), वडगाव पांडे, दिघी होणाडे, सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जलाशयातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले आहे. परिणामी, वर्धा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय संभाव्य धोका लक्षात घेऊन कुणीही नदी पात्रात जाऊ नये.- पवन पांढरे, उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा.
निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:00 AM
सततच्या पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, या जलाशयातील पाणी सोडण्याचा निर्णय घेत त्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले असून ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वर्धा नदीत होत आहे. परिणामी वर्धा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा