महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ ही योजना सन २०१६-१७ मध्ये शासनाने हाती घेतली. पहिल्या वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. तर यंदा तिसऱ्याही वर्षी हे अभियान वर्धा जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करून एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचा विडा जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाने उचलला आहे. या कामांची सुरूवात एप्रिल महिन्यात होणार आहे.गतवर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानाच्या माध्यमातून ४९ कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ३४ कामे पूर्ण करण्यात आली. त्यावेळी तलाव व धरणांमधून ३ लाख ७३ हजार ८८० घ.मी. गाळ निघेल असे अपेक्षित होते. प्रत्यक्ष कामादरम्यान ३,०६,६२० घ.मी. गाळ काढण्यात आला. त्यावेळी लोकसहभागातून १,९३,२६० घ.मी. गाळ काढण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षी हिंगणघाट तालुक्यातील सावली येथील गाव तलाव, धामणगाव येथील तलाव, सेलू (मुरपाड) येथील तलाव, आर्वी (छोटी) येथील साठवण तलाव, भिवापूर येथील साठवण तलाव, चिकमोह येथील गाव तलाव, उमरी (येंडे) येथील पाझर तलाव, कानगाव येथील साठवण तलाव, भय्यापूर येथील साठवण तलाव, समुद्रपूर तालुक्यातील साखरा येथील गाव तलाव, पिंपळगाव येथील गाव तलाव, पिंपरी येथील साठवण तलाव, गिरड १ येथील साठवण तलाव, गिरड २ येथील साठवण तलाव, कानकाटी येथील गाव तलाव, समुद्रपूर येथील गाव तलाव, नंदोरी येथील तलाव, मंगरुळ येथील पाझर तलाव, देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील गाव तलाव, गौळ येथील पाझर तलाव, कोल्हापूर (राव) येथील पाझर तलाव, आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील तलाव, तळेगाव (श्या.पं.) येथील पाझर तलाव, इंदरमारी येथील साठवण तलाव, आर्वी तालुक्यातील आजनगाव येथील पाझर तलाव, सालदरा येथील पाझर तलाव, पांजरा (बो.) येथील पाझर तलाव, काकडदरा येथील तलाव, गौरखेडा येथील तलाव तर कारंजा (घा.) तालुक्यातील आजनादेवी येथील तलाव, ठाणेगाव येथील तलाव, पिंपरी येथील तलाव, आगरगाव येथील पाझर तलाव, बांगडापूर येथील गाव तलाव, बेलगाव येथील तलाव व सुसुंद्रा येथील तलाव गाळमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.२ लाख ८७ हजार ८९० घ.मी. गाळ काढणारजिल्ह्यातील कारंजा (घा.), आर्वी, आष्टी, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट या तालुक्यातील एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ३६ तलावांमधून सुमारे २ लाख ८७ हजार ८९० घ.मी. गाळ काढण्यात येणार आहे. त्यासाठी जेसीबी आणि पोकलॅन्ड आदी यंत्रांना लागणाऱ्या इंधनासाठी ३४ लाख ३१ हजार ६४८.८० रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. हे ३६ तलाव गाळमुक्त आणि शेतकऱ्यांनीही हा गाळ आपल्या शेतात टाकून शेतजमिनीची पोत वाढवावी यासाठी जि.प.चा लघु पाटबंधारे विभाग हे अभियान केवळ शासकीय न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.मागीलवर्षी १५ कामे झाली रद्दशेतकºयांनी उत्साह न दाखविल्याने मागील वर्षी ४९ कामांपैकी १५ कामे रद्द करण्यात आली होती. त्यावेळी ११ लाख ५६ हजार ५८ रुपयांचा निधी खर्च करून शासकीय यंत्रणेने १ लाख १३ हजार ३६० घ.मी. गाळ तलावांमधून काढला होता. शिवाय, अनेक शेतकºयांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी देण्यात आला होता.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान यंदा तिसºया वर्षीही जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ३६ तलाव गाळमुक्त करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. यंदाच्या वर्षीच्या कामांना एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे.- हेमंत गहलोत, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प. लघु पाटबंधारे विभाग, वर्धा.
३६ तलाव गाळमुक्त करण्याचा उचलला विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:57 PM
‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ ही योजना सन २०१६-१७ मध्ये शासनाने हाती घेतली. पहिल्या वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. तर यंदा तिसऱ्याही वर्षी हे अभियान वर्धा जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करून एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचा विडा जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाने उचलला आहे.
ठळक मुद्दे‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान । एप्रिलमध्ये होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात