शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

3,70,807 नागरिकांनी मतदान कार्डसोबत लिंक केले आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 10:50 PM

मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे. व्हेरिफाय आयडी टाकल्यावर महाराष्ट्र राज्याची निवड करून प्रोसिडवर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर टाकून डनवर क्लिक करून कनफर्मवर क्लिक करावे. विशेष म्हणजे नागरिकांना घर बसल्या मोबाईलचा वापर करून ही प्रक्रिया करता येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत निवडणूक आयोगाने प्रत्येकाचे मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्यासाठीची मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. याच माेहिमेंतर्गत मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ७० हजार ८०७ नागरिकांनी शासकीय उपक्रमाला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत मतदान कार्डसोबत आधारकार्डची जोडणी करुन घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३३.७६ टक्के काम झाले असले तरी आगामी नवरात्री उत्सवात विविध ठिकाणी विशेष शिबिर घेऊन प्रभावी जनजागृतीही करण्यात येणार आहे. शिबिरांदरम्यान नागरिकांना ‘ऑन द स्पॉट’ मतदान कार्डसोबत आधार लिंक करता येणार आहे. एकूणच प्रभावी जनजागृतीसाठी निवडणूक विभागही सज्ज झाला आहे.

विशेष शिबिराला ३३,६७० नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद- ११ सप्टेंबर या दिवशी वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विशेष शिबिर घेऊन मतदान कार्डसोबत आधार लिंक करण्यात आले. याच एक दिवसीय शिबिराला ३३ हजार ६७० नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आपल्या मतदान कार्डसोबत आधार लिंक करून घेतले. या दिवशी आर्वी विधानसभा क्षेत्रात ७ हजार २६८, देवळी विधानसभा क्षेत्रात १० हजार १५८, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ८ हजार २८८ आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात ७ हजार ९५६ नागरिकांनी मतदान कार्डसोबत आधार कार्ड संलग्न करून घेतले.

आर्वी विधानसभा क्षेत्र प्रत्यक्ष कामात अव्वल- मागील दीड महिन्यांत वर्धा जिल्ह्यात मतदान कार्डसोबत आधार लिंक करण्याचे ३३.७६ टक्के काम झाले आहे. सर्वाधिक काम आर्वी विधानसभा क्षेत्रात झाले असून, आर्वी विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५४ हजार ६५८ मतदारांपैकी १ लाख १२ हजार १८२ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मतदान कार्डसोबत आधार लिंक करून घेतले आहे, तशी नोंदही निवडणूक विभागाने घेतली आहे.

मतदान कार्डसोबत आधार लिंक करणे सोपे- मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे. व्हेरिफाय आयडी टाकल्यावर महाराष्ट्र राज्याची निवड करून प्रोसिडवर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर टाकून डनवर क्लिक करून कनफर्मवर क्लिक करावे. विशेष म्हणजे नागरिकांना घर बसल्या मोबाईलचा वापर करून ही प्रक्रिया करता येते. एका ॲपवरून एकाच घरातील सहा व्यक्तींच्या मतदान कार्डसोबत आधार लिंक करता येते.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड