लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवार १ ते बुधवार ५ जून या कालावधीत वेळोवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तब्बल ३८३ कुटुंबियांच्या घरांचे अंशत: नुकसान केले आहे. तर वीज पडून चार बैल, तीन गाई गतप्राण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुकुप पालन केंद्रातील २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एकूणच या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेकांच्या अडचणीत भरच टाकली आहे.अंगाला चटके देणाऱ्या उन्हीनंतर वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे थोडा का होईना उन्हापासून दिलासाच नागरिकांना मिळाला आहे. असे असले तरी या वादळीवाऱ्यासह पावसाने अनेकांच्या अडचीत भर टाकल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांना आहे. ४ व ५ जून रोजी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून अनुक्रमे देवळी तालुक्यात दोन बैल व एक गाय तर वर्धा तालुक्यात दोन बैल आणि आर्वी तालुक्यात दोन गार्इंचा मृत्यू झाला. शिवाय ५ रोजीच झालेल्या वादळीवाऱ्यामुळे देवळी तालुक्यातील एका कुकुट पालन केंद्रावरील छत उडाले. यातच सुमारे २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची; शिवाय १ जूनला झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे १९८ तर ५ रोजीच्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे १८५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनातील नैसर्गिक आपत्ती विभागाने घेतली आहे. ही नुकसानग्रस्त घर वर्धा, देवळी, हिंगणघाट तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.चिकणीत गोठा कोसळलापाच शेळ्या ठार : तीन शेळ्या गंभीरलोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास परिसरात झालेल्या वादळीवाºयासह पावसादरम्यान चिकणी येथील एक गोठा कोसळला. यात दबून पाच शेळ्यांचा मृत्यू झाला तर तीन शेळ्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.दुपारी अचानक वातावरणात बदल घेत सोसाट्याच्या वाऱ्यासह परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला. याच वादळीवाऱ्यामुळे प्रल्हाद डोमाजी भुरकुंडे यांच्या घराला लागून असलेला गोठा कोसळला. घटनेच्या वेळी गोठ्यात सुमारे २० शेळ्या होत्या. वादळ वाऱ्यामुळे गोठ्याची भिंत कोसळली. यात दबून एकूण पाच शेळ्या गतप्राण झाल्या.मृतक जनावरांमध्ये तीन बोकड तर दोन शेळ्यांचा समावेश आहे. तर तीन शेळ्यांची प्रकृती चिंताजणक असल्याचे सांगण्यात येते. शिवाय उर्वरित शेळ्यांना गोठ्याबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.सदर घटनेमुळे शेळीपालक भुरकुंड यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमोल पारोदे, अक्षय बहादुरे आदींनी विशेष सहकार्य केले.
वादळीवाऱ्याचा ३८३ घरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:10 PM
शनिवार १ ते बुधवार ५ जून या कालावधीत वेळोवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तब्बल ३८३ कुटुंबियांच्या घरांचे अंशत: नुकसान केले आहे. तर वीज पडून चार बैल, तीन गाई गतप्राण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुकुप पालन केंद्रातील २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
ठळक मुद्देचार बैल, तीन गार्इंसह २०० कोंबड्यांचा मृत्यू : नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षाचिकणीत गोठा कोसळलापाच शेळ्या ठार : तीन शेळ्या गंभीर