लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत खरीप हंगामात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे कापूस व धान्य उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक आदेश निर्गमित करून शासकीय मदत देण्याचे जाहीर केले आहे. ही मदत तीन टप्प्यात देण्यात येणार असून पहिल्या टप्प्याची ४ हजार १०१ कोटींची रक्कम जिल्ह्याच्या महसूल विभागाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.सदर शासकीय निधी जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा या आठही तालुक्यातील २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. यात ३३ टक्के अधिक कपाशी पिकाचे बाधीत क्षेत्र घेण्यात आले आहे. बोंडअळीने बाधीत हिंगणघाट तालुक्यातील कपाशीची लागवड करणारे ३५ हजार ३२२ शेतकरी असून ३३ टक्के पेक्षा बाधीत शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार १६० इतकी आहे. समुद्रपूर येथील एकूण शेतकरी संख्या ३२ हजार ६६७ असून बाधीत शेतकरी संख्या ३२ हजार ६६७ आहे.वर्धा तालुक्यात ३० हजार ७८५ असून बाधीतांची संख्या ३० हजार ७७९ आहे. सेलू मध्ये २६ हजार ३६७ शेतकरी असून यात २६ हजार ३६७ शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. देवळी येथे कपाशी लागवड करणाऱ्यांची संख्या २९ हजार ५९१ असून शासकीय मदतीसाठी सदर सर्वच शेतकरी पात्र ठरले आहेत. आर्वी तालुक्यातील कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २१ हजार ५८२ असून या तालुक्यातील संपूर्ण शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. आष्टी तालुक्यातील १६ हजार ४९९ शेतकरी पात्र ठरले आहे तर कारंजा तालुक्यातील २० हजार ३०९ शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांना शासकीय मदत नाकारण्यात आली आहे व आर्वी तालुक्यासाठी १४ कोटींची मागणी होती. यात केवळ ५ हजार ४६८ शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ६४ लाख २१ हजार १७२ रुपयाचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वळता करण्यात येणार आहे. सदर सर्व क्षेत्र हे जिरायती स्वरूपाचे दाखविण्यात आल्याचेही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्तांसाठी ४ हजार १०१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:07 AM
गत खरीप हंगामात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे कापूस व धान्य उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक आदेश निर्गमित करून शासकीय मदत देण्याचे जाहीर केले आहे.
ठळक मुद्देतीन टप्प्यात मिळेल मदत : कपाशी उत्पादकांना दिलासा