शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तीन गोदामांमधून ४ हजार ६३५ बॅग युरिया केला जप्त; रविवारी रात्री कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:53 PM

Wardha : कृषी विभागाची कारवाई: गोदाम केले सील, 'टेक्निकल ग्रेड' युरियाची मोठ्या प्रमाणात साठेबाजी,

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची साठेबाजी केली असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाने रविवारी रात्री आर्ती आणि कारंजा तालुक्यात चौकशी केली. यादरम्यान त्यांना तीन गोदामांमध्ये 'टेक्निकल ग्रेड यूरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली असे लिहिलेल्या युरियाचा साठा आबकुळ आला. तिन्ही गोदामातून ४ हजार ६३५ बंग युरिया आढळून आल्याने गोदाम सील केले आहे. याप्रकरणी कृषी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे.

शेतीचा हंगाम सुरू असून, यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्या अनुषंगाने कृषी विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. अशातच त्यांना आर्वी व कारंजा घाडगे) तालुक्यातील काही ठिकाणी गोदामामध्ये युरियाची साठेबाजी केल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती, या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारंजा तालुक्यातील राजणी येथील कोहली यांच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात १ हजार १६० बैंग युरिया आढळून आला. त्यावर 'टेक्निकल ग्रेड यूरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेले होते. त्यामुळे येथील युरियाचे नमुने घेऊन गोदाम सील केले. तसेच आर्वी तालुक्यातील बाजारवाड़ा येथील विजय वाजपेयी यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. या गोदामात अशाच प्रकारचा तब्बल २ हजार ३४२ बंग युरिया आढळून आला. येथीलही नमुने घेऊन गोदाम सील केले. यासोबतच याच तालुक्यातील पिंपळखुटा येथील अग्रवाल यांच्याही गोदामात १ हजार ११३ बॅग युरिया आढळून आला. त्यामुळे तिन्ही गोदाम सील करून युरियाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. कृषी विभागाने तिन्ही गोदामातून १२ लाख ३५ हजार २०० रुपयांच्या ४ हजार ६३५ बेंग युरिया अप्त करून तो स्थानिक पोलिसांत ठाण्याकडे सुपूर्द नाम्यावर ठेवला आहे. ही कारवाई पुण्यातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, नागपूरचे तंत्र अधिकारी चंद्रेशेखर कोल्हे, आर्वीच्या तालुका कृषी अधिकारी वायवळ, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर व आर्मी पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवी दुबे यांनी केली. 

आगिक वसाहत नसताना साठेबाजी कशासाठी? कृषी विभागाने कारंजा आणि आर्वी तालुक्यातून एकाच दिवशी ४ हजार ६३५ बैंग युरिया जप्त केला आहे. या सर्व चुरियांच्या बेंगांवर 'टेक्निकल पेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली असे लिहिलेले आहेत, विशेषतः या दोन्ही तालुक्यात औद्योगिक वसाहत नाही किंवा कोणता मोठा उद्योगही नाही. असे असतानाही केवळ औद्योगिक वापरासाठी असलेल्या युरिवाची इतक्या मोठ्या प्रमाणात साठेबाजी कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

औद्योगिक वापराचा युरिया शेतीसाठी? शेतीचे दिवस असल्याने सध्या शेतीकरिता युरिवाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आर्वी व कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फक्त औद्योगिक वापरासाठीच असलेला युरिया आढळून आला. त्यामुळे हा युरिया इतकाच होता की यापेक्षाही जास्त साठा होता. हा युरिया शेतीकरिता वापरला का? कुण्या शेतकऱ्यांना विकला का? हा साठा कशासाठी करण्यात आला, याचा उलगडा आता तपासणी अहवालानंतरच होईल.

"गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा तालुक्यातील राजणी आणि आर्यों तालुक्यातील बाजारवाडा व पिंपळखुटा या तीन गुदामातून ४ हजार ६३५ बेंग युरिया जप्त करण्यात आला. या बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली असे लिहिलेले आहेत. याचे नमुने घेऊन अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल."- संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जि.प., वर्धा.

टॅग्स :Fertilizerखतेwardha-acवर्धा