लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे. शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप न झाल्याने बी-बियाणे, शेतीसाहित्य व अन्य खरेदी रखडल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी सुमारे तीन लाख शेतकºयांकरिता ७०० ते ७५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. यंदा शेतकऱ्यांना अधिक मदत व्हावी म्हणून १०० कोटी वाढवून ८५० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. शेतकºयांना कर्जमाफी दिल्याने यंदा सर्वच शेतकरी पीक कर्जाची उचल करतील, अशी अपेक्षा होती; पण अनेकांची कर्जमाफी अद्याप होऊ न शकल्याने पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. खरीप हंगामाला प्रारंभ झाला असताना केवळ ४० कोटींचे कर्जवाटप झाले. मग, ८५० कोटींचा टप्पा कधी गाठणार व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी घरपोच कागदपत्रे द्या- नवालछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे कर्ज माफ झाले आहे. या शेतकºयांना सातबारा, ८ अ आदी कागदपत्रे घरपोच देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पीक कर्ज आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक उपनिबंधक उपस्थित होते.शेतकºयांचा शेती हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ३० जूनपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे. ज्यांची कर्जमाफी झाली आहे, त्यांची यादी पंचायत समितीमध्ये उपलब्ध आहे. शेतकºयांनी स्वत:चे नाव यादीत समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. या यादीत गाव, बँक, शेतकºयांच्या नावासह उल्लेख आहे. यादीप्रमाणे सर्व तहसीलदार यांनी शेतकºयांना सातबारा, नमुना ८ ‘अ’ व कर्जमाफीचे तलाठ्यांचे प्रमाणपत्र तथा नवीन कर्ज घेण्यासाठी अर्ज आदी कागदपत्रे घरपोच उपलब्ध करून द्यावे. यासाठी तलाठ्यांनी गरज पडल्यास गावातील स्वयंसहायता बचत गट, पोलीस पाटील, कोतवाल, आशा यांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना नवाल यांनी दिल्या. बँकेतून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील १८००२३३२३८३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.तालुकास्तरावर गठित होणाºया समितीमध्ये तहसीलदार, बीडीओ, सहायक उपनिबंधक, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश करावा. या समितीचे नोडल अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधकांनी काम पाहावे.बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, आर्वीचे एसडीओ प्रकाश शर्मा, जिल्हा उपनिबंधक वालदे, अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, सर्व तहसीलदार, बीडीओ सहा. उपनिबंधक उपस्थित होते.
जिल्ह्यात ४० कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:03 PM
शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे.
ठळक मुद्दे८५० कोटींचे उद्दिष्ट गाठणे कठीणच