लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच प्रकल्पाची प्रभावी अंमलबजाणी करून नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत एकूण ५ हजार २९५ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकऱ्यांना उपचार देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय २० हजार ५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात ‘प्रेरणा’ हा शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प राबविल्या जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या कशा थांबविता येईल यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील ५ हजार २९५ शेतकरी नैराश्यग्रस्त असल्याचे पुढे आले. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकºयांवर उपचार करून सध्या पाठपुरावा करण्यात येत आहे. तर याच कालावधीत वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल ३ हजार ४३५ शेतकरी व्यनाधिन असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ५८६ व्यसनाधीन शेतकºयांवर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची प्रकृती सुस्थितीत यावी यासाठी पाठपुरावाही केल्या जात आहे. शिवाय ३३ हजार १७४ शेतकरी मानसिक आजार किंवा दडपण तसेच इतर आजाराने ग्रासले असल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तसेच पुलगाव हा परिसर अतिजोखमीचा असल्याचेही सर्वेक्षणात पुढे आले आहे.आशा स्वयंसेविकांचेही लाभते सहकार्यप्रेरणा प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचेही सहकार्य घेतले जात आहे. आशा स्वयंसेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात २०१५-१६ मध्ये नैराश्यग्रस्त ९९९ शेतकरी, २०१७-१८ मध्ये १ हजार ४८ शेतकरी तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात २ हजार ८७० शेतकरी आढळले. त्यापैकी वर्षनिहाय अनुक्रमे ५३०, ८७४ व २ हजार ६७६ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.
४,२१२ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना ‘प्रेरणा’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 10:16 PM
मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । २०,०५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा, पुलगाव अतिजोखमीचे