शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

मतदानासाठी ४,२२९ कर्मचाऱ्यांची फौज सज्ज

By admin | Published: February 15, 2017 2:11 AM

वर्धेत पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

२६९ वाहनांची व्यवस्था : शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता २,२०५ पोलीस वर्धा : वर्धेत पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक गटात आणि गणात मतदानप्रक्रिया सुरळीत व्हावी, याकरिता जिल्ह्यातील ४ हजार २२९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी आज बुधवारी सकाळी तालुका स्तरावरून त्यांना देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहे. जिल्ह्यात होऊ घातलेली निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता पोलीस विभागाचीही तयारी पूर्ण झाली आहे. या कामाकरिता वर्धेसह बाहेर जिल्ह्यातूनही कुमक मागविण्यात आली आहे. या कामाकरिता एकूण २ हजार २०५ पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. यात पाच उपविभागीय पोलीस अधिकारी १० पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार २११ पोलीस कर्मचारी, २२० नवप्रविष्ट कर्मचारी, ७०० सैनिक आणि त्यांच्या मदतीला एक एसआरपीएफचे प्लाटून देण्यात आले आहे. तसेच या कामाकरिता दंगल नियंत्रण पथकही नियुक्त करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांना देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहोचविण्याकरिता २६९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांच्या माध्यमातून त्यांना ९६१ केंद्रांवर पोहोचविण्यात येणार आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या ९० बसेस, १७३ जीप व सहा ट्रकचा वापर करण्यात येणार आहे. या वाहनातून त्यांना बुधवारी सकाळी प्रत्येक तालुका स्तरावरून त्यांच्या केंद्रावर नेणार असून गुरुवारी मतदानानंतर परत आणणार आहे. जिल्ह्यातील आष्टी (शहीद) तालुक्यतील ६८ केंद्रांकरिता ३०० कर्मचारी असून त्यांना पोहोचविण्याकरिता १९ वाहनांची व्यवस्था आहे. यात नऊ बस आणि १० जीप आहेत. कारंजा (घाडगे) येथील ८७ केंद्रावर असलेल्या ३८३ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता १९ वाहने आहेत. यात सात बस आणि १२ जीपचा समावेश आहे. आर्वी येथील ११५ मतदसन केंद्रावरील ५०७ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता २४ वाहने आहेत. यात सहा बस, १६ जीप आणि दोन ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील १११ केंद्रावर ४८८ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता ५९ वाहनांची व्यवस्था केली आहे. यात १३ बस आणि ४६ जीपचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील २०९ केंद्रावरील ९२० कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचविण्याकरिता ३९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १९ बस आणि २० जीपचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यतील १३५ केंद्रावर निवड झालेल्या ५९२ कर्मचाऱ्यांना केंद्रावर नेण्याकरिता ३९ वाहनांची व्यवस्था असून यात १२ बस, २५ जीप व दोन ट्रकचा समावेश आहे. देवळी तालुक्यात ११० केंद्रावरील ४८४ कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता ३३ वाहने असून यात १२ बस, १९ जीप आणि दोन ट्रकचा समावेश आहे. तर हिंगणघाट येथील १२६ केंद्रावर ५५५ कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता ३७ वाहने असून यात १२ बस आणि २५ जीपचा समावेश असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे. या वाहनातून निवडणुकीकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या केंद्रावर पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी) बुधवारी डोअर टू प्रचार, गुरुवारी मतदान जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या खुल्या प्रचाराला मंगळवारी रात्री विराम बसला. हा विराम बसण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक गट व गणांत उमेदवारांनी प्रचार रॅल्या काढल्या. कोणी दुचाकी रॅली काढली तर कुणी ढोल ताश्याच्या निणादात पायी रॅली काढूून आपल्या प्रचाराला विराम दिला. शासनाच्या सूचनेनुसार खुल्या प्रचाराची मुभा मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत होती. यात काही उमेदवारांनी गावपातळीवर सभाही आटोपल्या. खुल्या प्रचारानंतर उमेदवारांनी रात्रीतूनच आपल्या प्रभागात पायी वाऱ्या सुरू करण्याचे नियोजन आखले. तत्पूर्वी बुधवारी शक्य असलेल्या भागात ‘डोअर टू डोअर’ प्रचाराचे अनेकांचे नियोजन आहे. प्रचारानंतर कोणता भाग आपला आणि कोणत्या कार्यकर्त्याला जवळ करायचे याची चर्चा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात सुरू असल्याचे दिसून आले. कोणत्या भागात आपल्याला अधिक मते मिळणार, मागे असलेल्या परिसरात काय करावे या नियोजनावर उमेदवारांसह कार्यकर्त्यांत चर्चा होताना दिसून आली.