शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

४५ वर्र्षांपासून पशुवैद्यकीय दवाखाना भाड्याच्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:23 PM

येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ हजार स्के. फुट जागेच्या मागणीचा प्रस्ताव सेलू तहसील कार्यालयाकडे पाठविला.

ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : कधी थांबेल पशुवैद्यकीय दवाखान्याची भटकंती?

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ हजार स्के. फुट जागेच्या मागणीचा प्रस्ताव सेलू तहसील कार्यालयाकडे पाठविला. परंतु महसूल विभागाने सदर जागेच्या मोबदल्यात शासकीय बाजार भावानुसार ३,६२, ३२३ रू. इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यास सांगितले एवढी मोठी रक्कम कुठून आणि कशी जमा करावी, असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम आता दिवास्वप्न राहणार असल्याची भिती गोपालकांकडून वर्तविण्यात येत आहे.येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ ला स्वमालकीची इमारत मिळावी, अशी ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासून मागणी होती. त्याकरिता ग्रा.पं.च्यावतीने संबंधित विभागाकडे या मागणीकरिता पाठपुरावा केला होता. त्याकरिता पशु संवर्धन विभागाकडून इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. परंतु ग्रा.पं.कडे पुरेशी जागा नसल्यामुळे येथील वर्धा-नागपूर महामार्गावरील विश्रामगृहाजवळील शेत सर्वे क्र १२८ व १२९ ला लागून असलेली जुनी बंद वहिवाट असलेली पांदण रस्त्याची सहा हजार स्के.फुट जागेची निश्चिती करून ती महसूल विभागाने द्यावी, असे पत्र सेलूच्या तहसील कार्यालयाकडे देण्यात आले. तेवढी जागा देण्यास सेलूच्या तहसील कार्यालयाने अनुकुलता दर्शविली. परंतु सदर जागेचे निस्तार हक्क कमी करून ते आयुक्त पशुसंवर्धन म.रा.पुणे यांच्या नावे करण्याकरिता सदर जागेच्या मोबदल्यात शाासकीय बाजारभावानुसार ३,६२,३२३ रू. जागेची मुल्य शासनाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.पशुसंवर्धन विभागाकडून दवाखान्याच्या इमारत बांधकामाकरिता निधी दिल्या जात असून जागा खरेदी करिता निधीची तरतूद नसल्याने एवढी मोठी रक्कम महसूल विभागाकडे भरण्याकरिता कुठून आणि कशी उभी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.गावातील लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असून येथे गोपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच या दवाखान्याचे कार्यक्षेत्र केळझर, महाबळा, इटाळा, जंगलापूर, वडगाव (जं.) जुनगड, गायमुख या सात गावात विस्तारलेले आहे. कामाचा ताण एकट्या पशुधन पर्यवेक्षकावर आहे. सध्या स्थितीत दुग्ध सह. संस्थेच्या इमारतीच्या एका छोट्याशा खोलीतून सदर दवाखान्याचा कारभार मागील १०-१२ वर्षापासून सुरू आहे. याठिकाणी जागा अपुरी पडत असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांसह गोपालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय कधी ना कधी तीही जागा खाली करून द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन जागेकरिता भटकंती करावी लागेल.दवाखान्याच्या इमारतीकरिता जागा उपलबध करून द्यावी याकरिता आ.डॉ. पंकज भोयर यांच्याकडे गावकºयांनी सदर प्रश्न ठेवला असता त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या कार्यकक्षेत सदरचा विषय असल्याचे सांगितले आहे. व त्याकरिता आपण सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु उदासिन कारभारामुळे सदरचा प्रश्न मागे पडला आहे. या प्रश्नावर आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य विनोद लाखे यांनी पाठपुरावा करावा.