शहरं
Join us  
Trending Stories
1
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
2
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
3
तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!
4
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
5
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
6
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
7
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
9
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
10
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
11
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
12
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
13
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
14
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
15
"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार
16
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
17
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
18
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
19
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ

एम-किसानमध्ये ४.५६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:44 PM

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता यावे म्हणून शासनाच्या कृषी विभागाने एम-किसान हे वेब पोर्टल तयार केले आहे.

महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता यावे म्हणून शासनाच्या कृषी विभागाने एम-किसान हे वेब पोर्टल तयार केले आहे. एम-किसानमध्ये नागपूर विभागात वर्धेसह सहा जिल्ह्यांतील ४ लाख ५६ हजार ४८३ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागला आहे. १० डिसेंबर २०१४ रोजी सदर वेब पोर्टल तयार करण्यात आले होते. वेब पोर्टल तयार झाल्यापासून आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात १ लाख २ हजार शेतकऱ्यांपैकी ६४ हजार ७०८ शेतकऱ्यांची एम-किसानसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील कृषी विभागाद्वारे शेतीविषयक मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. आतापर्यंत कृषी विभाग वर्धाने जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना १६७ एसएमएस केले आहेत. अखेरचा एसएमएस ५ मे २०१७ रोजी पाठविण्यात आला आहे. या मॅसेमजधून वर्धा जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.पुण्यात केली जाते नोंदणी४एम-किसान नोंदणीचे जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने तालुक्यातून माहिती मागविली. त्यानंतर सदर माहिती पुण्याला पाठविण्यात आली. पुण्यातील अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील माहितीची नोंद घेत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ७०८ शेतकऱ्यांची नोंदणी केल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांची आम्ही नोंदणी केली आहे. त्यांना एसएमएसद्वारे योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले जात आहे. लवकरच जिल्ह्यातील पूर्ण शेतकऱ्यांना आम्ही यात सहभागी करून घेऊ.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.