चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील ६५ वर्षांवरील निराधार व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजनांपैकी श्रावणबाळ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना चालविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५७ हजार ६२१ लाभार्थींना यावर्षी ४६ कोटी ५ लाख ३२ हजार ८२७ रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ६०० रुपये महिना देण्यात येत होता. त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक लाभार्थींना आता एक हजार रुपये महिना देण्यात येणार आहे.राज्यातील ६५ व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समाविष्ट असावीत किंवा कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये २१ हजार रूपयापर्यंत असावे, अशा निराधार स्त्री व पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असे एकूण एक हजार रुपये निवृत्ती वेतन देय राहणार असून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना ४६ कोटी ५ लाख ९६ हजार रूपये प्राप्त झाले आहे.अनुदान वाढीमुळे निराधारांना दिलासाजिल्ह्यातील आठ तालुक्यंत देण्यात आलेल्या श्रावणबाळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थींना ६०० रूपये प्रतिमहिना अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढत्या महागाईमुळे लाभार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार वाढ करून १ हजार रूपये प्रति महिना अनुदान देण्यात येत असल्यामुळे निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
५७ हजार लाभार्थ्यांना ४६ कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM
राज्यातील ६५ व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देश्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना : आठ तालुक्यांचा समावेश