शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

आष्टीत डेंग्यूचे ४७ रूग्ण

By admin | Published: October 09, 2014 11:06 PM

तालुक्यात गत महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले आहे.

प्रकोप सुरुच : पेठअहमदपूर, तळेगावात सर्वाधिक प्रमाणअमोल सोटे - आष्टी (शहीद)तालुक्यात गत महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणासह आणखी तीन गावात डेंग्यूचा प्रकोप असल्याचे समोर आले आहे. गावागावात घाणीचे साम्राज्य, दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा, नालीमध्ये साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण वाढले आहे. सद्या तीव्र उन्ह तापत आहे. नागरिक गर्मीमुळेही त्रस्त आहे. त्यातच ताप येणे, उलट्या, हातपाय, डोकेदुखी या आजारामुळे चिमुकले तथा वयोवृध्द त्रस्त आहे. अनेक कुटुंब गरिबीच्या परिस्थितीत जगत असून खासगी रुग्णालयातील उपचार त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून औषध घ्यावे लागत आहे. शासकीय रुग्णालयात रक्ताची चाचणी केल्यानंतर डेंग्यूचे निदान झाल्यावरही प्रशासन संशयीत रुग्ण म्हणून पाहत आहे. याच रुग्णांनी खासगीत तपासणी केल्यास डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आष्टी येथील तौकीर जाकीर हुसेन (९) याला डेंग्यूच्या आजाराने चांगलेच ग्रासले आहे. त्याला नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याच्या प्रकृतित सुधारणा झाली. दुसरा रुग्ण महेकसभा युसुफ शहा (१२) ही सुद्धा डेंग्यूमुळे आठवडाभर सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल होती. तिला सद्या आराम आहे. आष्टी व पेठअहमदपूर मध्ये असंख्य रुग्णांना डेंग्यूने ग्रासले आहे. रुग्णांना तत्काळ आराम मिळावा म्हणून खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तळेगाव शहरामध्ये १५ च्या वर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. गावातील नाल्या, साचलेले पाणी, दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे डेंग्यूची साथ जोरात आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी अंतर्गत दररोज ४०० ते ६०० रुग्णांची तपासणी होत आहे. यात ५० टक्केच्यावर लोकांना तापाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तरीदेखील डॉक्टरांकडून तात्पूरती औषधी देवून वेळ निभावून नेल्या जात आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन्ही पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी पद देखील रिक्त आहे. या सर्व पदाचा कारभार प्रभारी अधिकारी म्हणून डॉ. एस.एस. रंगारी सांभाळत आहेत. एकाच डॉक्टरच्या खांद्यावर धुरा असल्यामुळे डेंग्यूच्या साथीला आळा घालणे कठीण जात आहे.