लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवरात्रोत्सवाचे आगळेच महत्त्व असून २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम व लंगरची धूम होती. शुक्रवारपासून माता दूर्गेच्या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होत आहे. रविवारपर्यंत ४७८ मूर्तीचे विसर्जन झाले. यावर्षी जिल्ह्यात ८९० सार्वजजिक दूर्गा मूर्तीची मंडळांद्वारे स्थापना करण्यात आली होती.गणेशोत्सवानंतर माता दूर्गेची आराधना केली जाते. नवरात्रोत्सवात वर्धा शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माता दूर्गेच्या मूर्तीचे दर्शन घेण्याकरिता शहरासह ग्रामीण भागातील जनता लोटली होती. नऊ दिवस भक्तीमय वातावरणात मातेची आराधना करण्यात आली. वर्धा शहरातील दुर्गोत्सवाला वाढत्या लंगरच्या आयोजनामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. यंदाही शहरात मोठ्या प्रमाणात लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय स्वच्छतेकडेही सामाजिक संस्थांनी तेवढेच लक्ष केंद्रीत केले होते. वैद्यकीय जनजागृती मंचासह अन्य संघटना व युवकांनीही मध्यरात्री स्वच्छतेची मदार सांभाळली.नऊ दिवसांच्या अर्चनेनंतर शुक्रवारी शहरातील १९ आणि ग्रामीण भागातील १० मूर्तीचे भक्तीमय वातावरणात पवनार येथील धाम नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. दसºयाच्या दिवशीही काही मूर्तीचे विजर्सन करण्यात आले. रविवारी शहरासह ग्रामीण भागातील ४४९ मूर्तीचे विसर्जन होणार होते. दुपारी ४ वाजेपर्यंत यातील १४८ मूर्तीचे विजर्सन धाम नदी पात्रात करण्यात आले तर उर्वरित मूर्तीचे विसर्जनही रात्रीपर्यंत करण्यात आले. शिवाय रोठा तलाव, सुकळी (बाई), येळाकेळी आदी ठिकाणी मातेच्या मूर्तीचे साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. विसर्जन पर्वात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पवनार धाम नदी व शहरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.विसर्जनासाठी गेलेला तरूण बुडालाशहरानजीकच्या रोठा येथील तलावात देवी विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. हरिष वसंतराव पिपरे (२२) रा. उमरी (मेघे), असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. सावंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अन्य घटनांची नोंद नाही.खोल पाण्यात उतरण्यास मज्जावपवनार येथील धाम नदीत खोल पात्रामध्ये मूर्तीसह उतरण्यास मनाई करण्यात आली होती. नदीवर पट्टीचे पोहणारे युवक तैनात करण्यात आले होते. शिवाय आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारीही तैनात होते.
४७८ मूर्र्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:05 AM
नवरात्रोत्सवाचे आगळेच महत्त्व असून २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम व लंगरची धूम होती. शुक्रवारपासून माता दूर्गेच्या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होत आहे.
ठळक मुद्देनवरात्रोत्सव : शहरासह पवनार धाम येथे पोलीस बंदोबस्त