शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 9:56 PM

महाशिवरात्रीचे औचित्य साधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून खरांगणा पोलिसांच्यावतीने सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत खरांगणा पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई केली. यात ४५ वाहनचालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीच्या पर्वावर खरांगणा पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाशिवरात्रीचे औचित्य साधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून खरांगणा पोलिसांच्यावतीने सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत खरांगणा पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई केली. यात ४५ वाहनचालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे हा मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा आहे. शिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याने सदर वाहनचालकाच्या जीवितास आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. असे असले तरी अनेकजण या नियमाकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानतात. खरांगणा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ढगा येथे महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये. शिवाय कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि अनुचित घटना टाळता यावी यासाठी सोमवारी खरांगणा पोलिसांनी ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वासह प्रत्यक्ष हजेरीत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान खरांगणा पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून ‘ब्रिथ अ‍ॅनालायझर’द्वारे कुठला वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत तर नाही ना, याची शहानिशा केली. मोहिमेदरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत खरांगणा पोलिसांनी मद्यधुंद असलेल्या चार व्यक्तींसह ४५ वाहनचालकांविरुद्ध फौजदारी कारवाई केली. ही मोहीम राबविण्यासाठी खरांगणा पोलिसांनी ५ महिला गृहरक्षक तर तर ४५ पुरुष गृहरक्षक जवानांचे सहकार्य घेतले.