शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 6:24 PM

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या वतीने पाणंद रस्त्यांसाठी ५ हजार ५४७ किमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यापैकी केवळ ७५८ किमीच्या रस्त्यांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.

रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येत असली, तरी या कामांना नियमाचा खोडा लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सुटता सुटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असून, अनेकांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेतली. प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून सुरू केलेल्या या चळवळीची दखल घेत राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली होती.

या योजनेत राज्य सरकारने सुधारणा करुन राज्यात मातोश्री ग्राम पांदन रस्ते योजना सुरू केली. 'मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध' ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचयातीला प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाभरातून ५५३ ग्रामंपचायतींकडून पाच हजार २४७ किमीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी २५ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान सादर झालेल्या १६ याद्यांमध्ये ५५४ रस्त्याच्या ७५८ किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. २४ कामे रद्द करण्यात आली असून, ४८९ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ४१ पाणंद रस्ते तात्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर ठेवण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी देवळी वगळता इतर सर्व तालुक्यांत ९३ कामे सुरू असल्याची माहिती मनरेगा विभागाकाडून देण्यात आली आहे.

सुरु असलेली कामेआर्वी - ३३आष्टी - १४देवळी - ०९हिंगणघाट - 00कारंजा - ०७समुद्रपूर - ०६सेलू - ०५वर्धा - १९

रोहयोच्या कामासाठी मजूरही मिळेनामंजूर प्रस्तावाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला सांगण्यात आले. खोदकामाचा समावेश असल्याने किमान २० मजुरांची आवश्यकता आहे; मात्र खोदकामासाठी २० मजूरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अकुशल कामांना योजनेत प्राधान्य कमी असल्याने ही कामे थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

२४ पाणंद रस्त्यांची कामे रद्दमंजूर पांदन रस्त्यांपैकी २४ कामे रद्द करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ९ पांदन रस्त्यांची कामे बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आल्याने रद्द करण्यात आली, तर वर्धा तालुक्यातील तळेगाव ग्रामंपचा- यतीचे एक काम शासनस्तरावरून, तर एक कामाचे डबल लोकेशन आल्याने रद्द करण्यात आले आहे. तर सेलू, आणि कारंजा तालुक्यातील पांदन रस्त्याचे डांबरीकरण, लोकेशन डबर दाखविण्यात आल्याने, तसेच वनविभागात रस्ते येत असल्याने १३ कामे रद्द करण्यात आली आहे.

तालुकानिहा प्रस्तावतालुका             ग्रामपंचायत          प्रस्ताव           मंजुरीआर्वी                     ७२                       ३१८                 ७७आष्टी                     ४१                        १७८                ७०देवळी                    ६३                       २६०                ८७हिंगणघाट               ७८                       २८९                ७६कारंजा                   ३१                        १५०                ३७समुद्रपूर                 ७७                       ५४६                ५८ सेलू                       ९९                        ५०३                ५४वर्धा                       ९२                         ५७०               ७१

"रोजगार हमी योजनेत कुशल कामांना प्राधान्य देण्यात येते. यात फळबाग लागवड, इतर कामांचा समावेश आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मजुरांचा अभाव असल्याने बहुतेक कामे मशिनद्वारे करावी लागतात. त्यामुळे मंजुरी देताना मर्यादा येते. सध्या ७५८ किमी रस्त्यांना मंजुरी दिली असून ९३ रस्त्यांची कामे सुरू आहेत."- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वर्धा, 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा