शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

By admin | Published: February 10, 2017 1:26 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे.

पाच आगारात २८३ बसगाड्या : नादुरूस्त बसेसमुळे प्रवाशांना फटका वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता पूर्णत: फिट नसलेल्या बसगाड्या रस्त्याने धावत असल्याने झालेल्या रस्त्यात मध्येच ब्रेकडाऊन होत आहे. यामुळे मुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बन ५० बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडल्याची नोंद विभागात आहे.प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला आपली बस म्हणून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तिच्याकडे पाहत आहेत. या बसमधूनच त्यांचा प्रवास होत आहे. याच प्रवाशांच्या बळावर नफा कमविण्यात वर्धा विभागाने राज्यात नाव काढले आहे. मात्र याच प्रवाशांना सेवा अत्यावश्यक पुरविण्यात हा विभाग हयगय करीत असल्याचे दिसत आहे. रस्त्याने धावणाऱ्या बसगाड्या फिट आहेत अथवा नाही, याची कुठलीही शहानिशा न करता त्या पाठविण्यात येतात. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याचा त्रास त्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रवाशांना सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील पाच आगारातून एकूण २८३ बसगाड्यांच्या माध्यमातून १,६६२ फेऱ्या होत आहेत. या रस्त्याने धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्या नादुरूस्त असल्याचे दिसते. प्रवाशांच्या सेवेत धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्यांची जीवनरेषाच ब्रेक झाल्याचा अंदाज त्यांची अवस्था पाहताच येतो. या गाड्यात ना धड आसन व्यवस्था ना धाडाच्या खिडक्या आहेत. त्यांची तावदाने तर केव्हाच फुटली असल्याचे दिसून आले आहे. बसच्या चालकाला मागाहून येणारे वाहन दिसण्याकरिता असलेला आरसाही (साईड मिरर) बऱ्याच गाड्यात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारातून परिवहन महामंडळाच्या लालपरिचा प्रवास सुरू आहे. याच बसगाड्यांच्या आधारावर वर्धा विभाग नफा कमविण्यात राज्यात आघाडी घेत असून सेवांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी) पाच आगारातून लालपरीच्या दररोज १६६२ फेऱ्या नागरिकांना बससेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातून तब्बल १ हजार ६६२ बसफेऱ्या होत आहेत. मात्र यातील बऱ्याच बस प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे दिसून आले आहे. याचा त्रास बसमधील प्रवाशांना होत आहे. शिवाय परिवहन विभागालाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याचा विचार राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे.