वर्धा : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून, अतुल वांदिले यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या तब्बल ५० पदाधिकाऱ्यांनी अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. यामुळे मनसेला मोठा झटका बसला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकरसह ५० मनसे पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, जिल्हा निरीक्षक राजू ताकसाळे, युवा राष्ट्रवादी काँगेसचे सूरज चव्हाण, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप किटे, दशरथ ठाकरे उपस्थित होते.
नव्याने पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांची गुणवत्ता पाहून स्थान दिले जाणार असे ना. पाटील यांनी सांगितले. या पक्षात नवे जुने असे काही नसून मेरिटवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अजय पर्बत, शेतकरी सेना जिल्हा सचिव प्रल्हाद तुराळे, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष शंकर देशमुख, जावेद मिर्झा, कांढली सर्कल अध्यक्ष हरिदास तराळे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष गजानन चिडे, समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर येंडे, समुद्रपूर तालुका सचिव अमोल मेंडुले, समुद्रपूर शहर उपाध्यक्ष पुरुषोत्तम कांबळे, हिंगणघाट शहर उपाध्यक्ष परम बावणे, प्रशांत एकोनकर, राजू खडसे, दीपक चांगल, पप्पू आष्टीकर, रवी सोनकुसरे, प्रफुल्ला आंबटकर, देविदास चौधरी, पंकज भट, राजू मेसेकर, अनिल भुते, रमेश चतुर, प्रवीण हटवार, बाबाराव गुंडे, शेखर दाते, राकेश खाटीक, जितेंद्र भुते, तुकाराम कापसे, प्रवीण भुते, आशिष दंतलवार, निखिल शेळके, मिथुन चव्हाण, निखिल ठाकरे, मनीष मुडे, जितेंद्र पंढरे, विकास चिंचोलकर, मनोहर सुपारे, अनिकेत वानखेडे, बालेश कोवाड, संतोष हेमके, अभय सावरकर, कार्तिक वाढई, सौरभ वैरागडे, कुणाल भुते, सुरेंद्र पाटील, संकेत बेतवार, गणेश वैद्य, अलीमबेग मुर्तुजाबेग मिर्झा, अकील खान जमील खान आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.