शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

५४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित?

By admin | Published: January 23, 2017 12:37 AM

दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती,

वर्धा : दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाद्वारे स्कॉलरशीप व फ्रिशीप दिली जाते. यंदा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील एकूण ३६ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षासह गत सहा सत्रांची माहिती घेतली असता एकूण ५४ हजार ५२६ अर्ज विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित तर राहणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजना राबविताना मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. समाज कल्याण उपायुक्त कार्यालयाच्यावतीने झालेल्या गैरप्रकाराबाबत संबंधितांना नोटीसही पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात अनेक शिक्षण सम्राट व संस्थाचालक अडकले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी चौकशी व संबंधित विभागाच्या कार्यवाहीनंतरच कोण दोषी, हे समोर येणार आहे. शिष्यवृत्ती योजनेचा गरजुंना लाभ मिळावा व सदर कार्य पारदर्शी व्हावे, यासाठी शासनाने या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्यांचे अर्ज आॅनलाईन स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. सन २०११-१२ या शैक्षणिक सत्रात विविध प्रवर्गातील एकूण ४८ हजार ८९५ अर्ज प्राप्त झाले होते. २०१२-१३ मध्ये ४९ हजार ५०४, २०१३-१४ मध्ये ४८ हजार ३६८, २०१४-१५ मध्ये ४७ हजार ३५३, २०१५-१६ मध्ये ४८ हजार १९८ आणि २०१६-१७ मध्ये आतापर्यंत ३६ हजार ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २०११-१२ मध्ये ४५ हजार ६८६, २०१२-१३ मध्ये ४५ हजार ७०८, २०१३-१४ मध्ये ४४ हजार १४३, २०१४-१५ मध्ये ४४ हजार ५५८, २०१५-१६ मध्ये ३९ हजार ७३१ तर २०१६-१७ मध्ये आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षीसह गत सहा शैक्षणिक सत्रांत आतापर्यंत एकूण २ लाख ७८ हजार ६५९ आवेदन प्राप्त झाले आहेत. यापैकी एकूण २ लाख २४ हजार १३३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. स्कॉलरशीप व फ्रिशीपचे आजही ५४ हजार ५२६ अर्ज प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे संबंधित महाविद्यालयांनी पाठपुरावा न केल्याने, त्यात त्रूट्या असल्याने आणि अन्य काही कारणांनी प्रलंबित असल्याचेही सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप व फ्रिशीप योजनेच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करणे तथा महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी) यंदा इतर मागासवर्गीयांची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित स्कॉलरशीप व फ्रिशीपसाठी शैक्षणिक सत्र २०१६-१७ या वर्षाकरिता आतापर्यंत इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे २१ हजार ८९८, अनु. जातीचे ९ हजार ३६९, विमाप्रचे १ हजार ३५६ तर विजाभज प्रवर्गातील ३ हजार ७१८ अर्ज समाज कल्याण उपायुक्त कार्यालयात प्राप्त झाले आहेत. यापैकी इमावचे २ हजार १९०, अनु. जातीचे १ हजार ४२४, विमाप्रचे २७४ तर विजाभज प्रवर्गातील ४१९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. इतर मागासवर्गातील १९ हजार ७०८, अजा ७ हजार ९४५, विमाप्र १ हजार ८२ तर विमुक्त जाती भटक्या जमातीची ३ हजार २९९ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. अर्जासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे २०१६-१७ मधील नवीन अर्ज नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्यांनी अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी देण्यात आली आहे. विहित मुदतीच्या आत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण निरीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे.