लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चंद्रपूर येथे दारू नेली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनासह ५.५१ लाखांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई पोलिसांच्या डीबी पथकाने नंदोरी येथे केली.जाम मार्गे हिंगणघाटकडून नंदोरी मार्गे एका चारचाकी वाहनातून चंद्रपूर येथे दारू नेली जात होती. याबाबत माहिती मिळताच डी.बी. पथकाने नंदोरी ते हिंगणघाट रोडवर सापळा रचला. एमएच १२ डीएस १९१८ हे वाहन येताना दिसताच थांबविण्याचा प्रयत्न केला; पण वाहनाने पळ काढला. यावरून पाठलाग करीत सावली (वाघ) येथे गाडी थांबविली. दरम्यान, चालक गाडी सोडून पसार झाला. वाहनाची झडती घेतली विदेशी दारू आढळून आली. यात ५ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., एसडीपीओ दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन इप्पर, सचिन भारशंकर, मनोज खरकाटे यांनी केली.बसची प्रतीक्षा करणाºया दोघांना अटक, दारू जप्तसमुद्रपूर - बुट्टीबोरी येथून हिंगणघाट येथे जात असलेली अवैध देशी दारू पोलिसांनी जप्त केली. यात दोघांना अटक करण्यता आली. जाम बस स्थानकावर संजय लक्षीणे (४५) व विकास भगवान भगत (३७) दोन्ही रा. हिंगणघाट हे बसची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान, प्राप्त माहतीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याकडील चारही बॅगची तपासणी केली. यात २० हजार रुपयांचा दारूसाठा आढळून आला. यावरून दोन्ही आरोपींना अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार प्रवीन मुंडे यांच्या मार्गदर्शनात चांगदेव बुरंगे, अशोक चंहादे, राधाकिसन घुगे, गजानन दरणे, संतोष जैस्वाल, विरेंद्र कांबळे, राजेंद्र जैसिंगपुरे, अजय घुसे, जांबुळे आदींनी केली.३.८३ लाखांचा माल जप्तवर्धा - बरबडी शिवारातील बैरागी नाल्यालगत झुडपामध्ये गावठी दारूसाठी लागणारा कच्चा माल साठविला असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकत चौघांना अटक केली. यात ३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बरबडी परिसरात दशरथ किसनाजी लेंडे (५०), सुधाकर चिंतामण लेंडे (४९), प्रमोद चिंतामण लेंडे (४२) व महादेव शंकर मोहर्ले (३७) सर्व रा. बरबडी यांनी बैरागी नाल्यालगत झुडपामध्ये गावठी मोहा दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा मोहा रसायनची साठवणूक केल्याची तथा भट्टी सुरू केल्याची माहिती मिळाली. यावरून पंच व पोलिसांनी धाड टाकत ३ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सेवाग्राम ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सुधीर कोडापे, गजानन गिरी, दीपक वानखडे, सतीश जांभुळकर, दिनेश तुमाने, विलास गमे, योगेश चन्ने, रणजीत काकडे, तुषार भुते, राजेश पाचरे, अमोल तिजारे, योगेश घुमडे, राहुल गोसावी, अजय वानखेडे यांनी केली.
वाहनासह ५.५१ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:43 PM
चंद्रपूर येथे दारू नेली जात असल्याची माहिती मिळाली.
ठळक मुद्दे५.५१ लाखांचा दारूसाठा जप्त