रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. शिवाय दरही पडले होते. यामुळे सोयाबीन उत्पादकांकरिता शासनाच्यावतीने क्विंटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली होती. मदतीची घोषणा केल्यानंतर दुसरा खरीप हंगाम निपटला तरी मदतीच्या रकमेची शेतकºयांना प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता संपली असून या मदतीचे ५ कोटी ६१ लाख २ हजार ६९० रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या मदतीचा लाभ जिल्ह्यातील १९ हजार ४२६ शेतकºयांना मिळणार आहे.सोयाबीन उत्पादकांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता म्हणून शासनाच्यावतीने ही मदत जाहीर केली होती. जिल्ह्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत २५ क्विंटल पेक्षा कमी सोयाबीन विकणाºया शेतकºयांना या मदतीचा लाभ मिळणार होता. या नियमानुसार जिल्ह्यात २ लाख ८० हजार ५१३ क्विंटल सोयाबीनची विक्री झाल्याची नोंद आहे. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पाठविण्यात आलेल्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्या होत्या. या याद्यांत असलेल्या शेतकºयांना ही मदत जाहीर झाल्याने त्यांना हंगामाच्या पूर्वी ही मदत मिळावी अशी अपेक्षा होती. परंतु नित्याप्रमाणे त्यांना मदतीकरिता वर्षभर वाट पहावी लागली.यंदा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अनेकांकडून कृषी कर्जाची उचल झाली नसल्याने ही मदत मिळाल्यास हंगाम साधता येईल असे त्यांना वाटत होते. मात्र त्यांची अपेक्षा फोल ठरली. यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात आल्यानंतर या मदतीची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्याला मिळाली तरी ती शेतकºयांच्या खात्यात जमा होईपर्यंत आणखी किमान दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातही रक्कम शेतकºयांना मिळते अथवा बँक कोण्या नियमानुसार कोणत्या कर्जात कपात करते, याकडे नजरा आहेत.बँकेच्या याद्या बनविण्याचे काम सुरूजिल्ह्यातील बाजार समिती आणि उपबाजाराकडून आलेल्या याद्यांनुसार शेतकºयांच्या बँक खात्याची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. या याद्या पूर्ण होताच ती रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होईल. याकरिता आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.शासनाने जाहीर केलल्या मदतीची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ती रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता याद्या करण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार होताच रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात जमा होईल.- जयंत तलमले, सहा. जिल्हा उपनिबंधक.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मिळाले मदतीचे ५.६१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:44 PM
गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. शिवाय दरही पडले होते. यामुळे सोयाबीन उत्पादकांकरिता शासनाच्यावतीने क्विंटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली होती.
ठळक मुद्देसोयाबीनकरिता २०० रुपयांची मदत : १९,४२६ शेतकºयांना मिळणार लाभ