शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

५७ शाळा प्रगत व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:47 AM

जिल्ह्यातील शासकीय प्रत्येक शाळा प्रगत शाळा म्हणूनच संबोधीली गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांसह संबंधीतांकडून प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे.

ठळक मुद्देनयना गुंडे : मुख्याध्यापकांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शासकीय प्रत्येक शाळा प्रगत शाळा म्हणूनच संबोधीली गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांसह संबंधीतांकडून प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. ५७ शाळा प्रगत शाळा व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी केले.जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) व डीआयईसीपीडी वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. तसेच न. प.च्या अप्रगत शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोेलत होत्या. व्यासपीठावर डॉ. रेखा महाजन, भंडारा जिल्हयातील खराशी शाळेचे मुख्याध्यपक मुबारक सय्यद, रत्नमाला खडके, औढेकर, पुसदकर, डॉ. वाल्मिक इंगोले, सुरेश हजारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जि. प. प्राथमिक शाळा सुलतानपूर पं.स. हिंगणघाट येथील विद्यार्थिनी सुहानी भगत हिने चला प्रगत होऊया हे नाट्य सादर केले. यावेळी मुबारक सय्यद यांनी मोचक्या शब्दात स्वत: च्या शाळेत केलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच अनुभव कथन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रगत आठ शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची यशोगाथा व शाळा प्रगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वर्धा पं. स. मधून प्राथमिक शाळा तळेगाव (टालाटूले)चे चंद्रशेखर वैद्य, देवळीतून प्राथमिक शाळा आगरगाव पारधीतांडाचे संजय भोसले, सेलू पं.स. मधून उच्च प्राथमिक शाळा वाहीतपूरचे देवेंद्र गाठे, हिंगणघाट पं.स.मधुन प्रा.शा.सुलतानपूरच्या शुभांगी वासनिक, पं.स. समुद्रपूर प्रा. शा. तावीचे चितेश्वर ढोले, पं.स.आर्वी मधुन प्रा.शा. पिंपळखुटाचे राहुल राजनेकर, पं.स. आष्टी प्रा.शा.गोदावरीचे हिवसे, पं. स. कारंजा प्रा.शा. कुंडीचे मादरपल्ले यांनी प्रगत शाळेची माहिती दिली. १० शाळा आयएसओ केल्या बद्दल केंद्र प्रमुख वसंत खोडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सदर कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, ५७ अप्रगत शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला शुभांगी मेश्राम व विजय झिले यांनी सहकार्य केले.