लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध तलावांमधून ६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे सदर तलावांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. इतकेच नव्हे तर २५० शेतकºयांना सदर तलावातील गाळ नि:शुल्क देण्यात आला आहे.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आष्टी व सेलू तालुका वगळता इतर सहा तालुक्यातील एकूण ४८ कामे हाती घेवून ती पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सदर ४८ कामांदरम्यान जिल्ह्यातील विविध जलायशांमधून एकूण ३ लाख ९३ हजार २७९.५ घ.मि. गाळाचा उपसा करून या जलाशयांच्या पाणी साठवण क्षमतेत ३९३.२९ स.घ.मि.ने वाढ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न होत आहे.आतापर्यंत शासकीय निधीतून ४२ हजार ३२ घ.मि. तर लोकसहभागातून १ लाख ९१ हजार ६१० घ.मि. गाळ विविध तलावातून काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तलाव व जलाशयांमधुन आतापर्यंत २ लाख ३३ हजार ६४२ घ.मि. गाळ काढण्यात आल्याने सदर तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत २२३.६४ स.घ.मि.ने वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. तलावांमधून काढण्यात येत असलेला गाळ परिसरातील शेत जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना नि:शुल्क दिल्या जात आहे. आतापर्यंत २५० शेतकºयांनी याचा लाभ घेतला असून ही योजना शेतकºयांसाठी फाद्याची ठरत आहे.हिंगणघाट विभाग आघाडीवरजिल्ह्यातील हिंगणघाट महसूल उपविभागात नऊ कामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आठ कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने व तेथे मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याने हिंगणघाट उपविभागाने सदर योजनेच्या कामात आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते. तर वर्धा उपविभागात १३ पैकी ८ कामे व त्या खालोखाल आर्वी उपविभागात २६ पैकी ९ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. गत वर्षी बोटावर मोजण्या इतकी कामे पूर्ण झाली. परंतु, यंदा मोठ्या प्रमाणात कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ६० टक्के काम पूर्ण झाले आहेत. यामुळे जलाशयांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. यंदाचा पाणी फाऊंडेशनचा उपक्रम नुकताच संपल्याने या कामाला आता वेग दिल्या मिळणार आहे. नियोजित वेळेत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यातील संपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.-हेमंत गहलोत, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.
‘गाळमुक्त धरण’चे काम ६० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:42 PM
शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत.
ठळक मुद्दे२५० शेतकऱ्यांनी नेला तलावातील गाळ : २२३.६४ स.घ.मि.ने वाढेल जलाशयांची पाणी साठवण क्षमता