हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच नवीन हातपंप बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील लक्ष्मीनारायणपूर, शेकापूर, तळणी (भागवत) आदी गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण व खोलीकरण आणि टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतेक गावात पाणीपुरवठा योजनेव्दारे विहिरीवरुन नळाने पाणीपुरवठा केल्या जातो.परंतु या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच देवळी शहर व ग्रामीण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीबाणी उद्भवली आहे.मे महिन्यात ही पाणीबाणी आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.उपाययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर मदारतालुक्यात पाणीटंचाई असतानाही टंचाई निवारणार्थ पंचायत समिती स्तरावर कोणताही फंड उपलब्ध नाही. आणीबाणीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.देवळी शहराची ३५ कोटीची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून पूर्णत्वास गेली नाही. जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी पुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहाकार्य करण्याची मागणी होत आहे.नळ योजनेने सार्वजनिक विहिरी निकामीतालुक्यात ५३६ सार्वजनिक विहिरी, ६१२ हातपंप व ११ हातपंपावर विद्युत पंप कार्यरत आहे.परंतु गावातील बहुतेक विहिरी नळ योजनेमुळे निकामी पडल्या आहे. अशा विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने अनेक विहिरीत गाळ साचून दुर्लक्षित आहे. प्रशासनाने लक्ष घालून या विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे हाती घेणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बंदावस्थेत असलेले हातपंपाच्या दुरुस्तीकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:13 PM
तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.
ठळक मुद्देतीन गावे टंचाईग्रस्त : पंचायत समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर