ऑनलाईन लोकमत वर्धा : कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. यामुळे जोडणी कपातीच्या संकटातून बचावाकरिता उर्जामंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार तीन ते पाच हजार रुपये भरून जोडणी कायम ठेवण्यात येत आहे. या घोषणेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ५९५ शेतकºयांना होणार आहे.शेतकºयांची थकबाकी ३० हजारांच्या आत असल्यास ३ हजार रुपये आणि ३० हजारांच्या वर थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. शिवाय बºयाच शेतकऱ्यांना त्यांच्या देयकाची दुरूस्ती करावयाची आहे. त्याकरिता १ ते ३० डिसेंबरपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. हा निर्णय होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जोडण्या कापण्यात आल्या आहेत. यापैकी जे शेतकरी रक्कम भरतील त्यांची कापलेली वीज तत्काळ जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना त्यांची देयके वाढीव आली आहे असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय होणार असलेल्या शिबिरात आपली तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे. या तक्रारीवर कारवाई करण्याकरिता विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण ६८ हजार १८० शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे. त्यांच्याकडे ६३ कोटी ८६ लाख ७१ हजार ८७३ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जून आणि मार्च महिन्यातील आहे. या दोन महिन्याच्या थकबाकीदारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणकडून मिळालेल्या माहितीवरून दिसत आहे. सध्या शेतकºयांच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कमही भरणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महावितरणने यातूनही शेतकºयांना सूट द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:49 AM
कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना : उर्जामंत्र्यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा