शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साहुरवासीयांनी जपली ७ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:32 PM

अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत मानव जोडो संगठन, साहूर द्वारा रंगाविना धुळवड कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देअखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम

आष्टी (श.) : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत मानव जोडो संगठन, साहूर द्वारा रंगाविना धुळवड कार्यक्रम घेण्यात आले. ७ वर्षांची परंपरा कायम ठेवत गावातील शेकडो लोकांनी दिवसभर विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.गुरूकुंज आश्रम मोझरी येथून आलेल्या अमोल बांबल आणि बालकलावंतांनी राष्ट्रसंताची एकापेक्षा सरस भजने सादर केली. साहूरच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित धुळवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष उत्तमर करांगळे, ग्रामगीताचार्य प्रा. विनोद पेठे, गुरूदेव सेवा संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप कोहळे, कवी कृष्णाभाऊ हरले, विद्यापीठ नामकरण लढ्याचे प्रणेते रमेशचंद्र सरोदे, सरपंच वनिता लवणकर, गोपाल अग्रवाल मंचावर उपस्थित होते.प्रारंभी राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील भारत आणि ग्रामगीता यावर अमोल बांबल यांनी भाषणातून प्रकाश टाकला. बालकलावंतांनी भजने, कव्वाली सादर केल्या. मी जिजाऊ बोलते एकांकीका सादर केली. अमरावती येथील कलाकार यशश्री काशीकर हिने यातून दमदार अभिनयाची चुणुक दाखविली. त्यानंतर मी सावित्री बोलले एकांकिका साहुरची तरूणी अंकिता शिंदे हिने सादर केली. दोन्ही एकांकिकामधील प्रसंग पाहून साहूरवासी भारावून होते.सुसुंद्रा येथील विद्यार्थीनी नंदिनी पाटमासे हिने ग्रामगीतेच्या ओवीसह त्यांचा भावार्थ सांगितला. नंदिनीच्या या प्रभावी वक्तृत्वाने तिने उपस्थितांना स्तब्ध केले. यानंतर साहूर गावात गेल्या ४० वर्षापासून निस्वार्थ ग्रामस्वच्छता करणारे वैराग्यमूर्ती देवबाबू निकोडे, पत्रकार अमोल सोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चिमुकले, महिला, पुरूष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळवडीचा दिवस असूनही कुणीही रंगाची उधळण केली नाही. यानंतर गावातील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. भगवी टोपी घालून सर्व गावकरी राष्ट्रसंताच्या विचाराची महती देत होते. कार्यक्रमाचे संचालन हरिभाऊ टाकळकर यांनी तर आभार दीपक खरडे यांनी मानले. आयोजनाला ग्रामस्थांनी सहकार्य केले.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८