शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 3:29 PM

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती.

वर्धा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. या योजनेत वर्धा जिल्ह्यात १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी लाभार्थी म्हणून करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ७३ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यात १ लाख १३ हजार १३ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र आहे. यापैकी ३९ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते मोबाईल क्रमांक, आधार याच्याशी लिंक करण्यात आले आहे. या शेतक-यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी २ हजार प्रमाणे तीन टप्प्यात दिले जात आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी या योजनेच्या लाभासाठी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पीएम किसान पोर्टल येथे हे नावे नोंदविले. यापैकी ७३ हजार ५८७ शेतक-यांचे बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे केवळ ३९ हजार ४१८ शेतक-यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.-----सेवा केंद्रात लिंकचे काम युद्धपातळीवर चालणारजिल्ह्यातील लाभ न मिळालेल्या ७३ हजार ५८५ शेतक-यांची संख्या लक्षात घेऊन आता बँक खाते, मोबाईल क्रमांक व आधार याच्याशी लिंक करण्याचे आदेश सेवा केंद्रांना प्रशासनाने दिले आहे. त्या दृष्टीने सर्व तहसीलदार व महाऑनलाइनचे समन्वयक शेतक-यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर कामाला गती देण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तांनीही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्डPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना