शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

८ लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: May 23, 2017 1:01 AM

घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा चोरी केली.

कारंजा शहरात भरदिवसा घरफोडीने खळबळ लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा चोरी केली. या चोरीत चोरट्याने घरातून सोन्या चांदीचा ऐवज व रोख रक्कम, असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी दुपारी येथील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घडली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून घटनेची नोंद केली. पोलिसांना चोरीत चोरट्यांचा कुठलाही सुगावा लागला नाही. यामुळे चोरी करणारे शहरातील आहेत अथवा बाहेर जिल्ह्यातील याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हातीही काहीच आले नाही. रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लांबविलेल्या या घटननेने शहरात खळबळ माजली. पोलीस सुत्रानुसार, शहरातील ब्लास्टिंग, क्रेनचे व्यावसायिक अन्नराज गायकवाड हे त्यांच्या कुटुंबियांसह विवाह समारंभाकरिता गेले होते. आज दुपारी त्यांच्या घरी कुणी नव्हते. याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. गायकवाड दुपारी घरी आले असता चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घराच्या मागचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लाकडी कपाटातून ३ तोळे वजनाची सोन्याची पोत, २ तोळ वजनाचा नेकलेस, अडीच तोळ्यांची चैन, २ तोळ्यांच्या तीन अंगठी, २ तोळ्यांच्या बांगडया यासह १ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील टॉप आदी दागिन्यांसह १ लाख १० हजार रुपये असे साहित्य लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड, अमोल बरडे, व मनोज नामक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची नोंद केली आहे. के्रनच्या विक्रीची रक्कमही चोरट्याने पळविली गायकवाड यांचा क्रेनचा व्यवसाय होता. यात त्यांनी त्यांच्या मालकीच्या क्रेनची विक्री रविवारी केली. याची रक्कम घरीच होती. चोरट्याने ती रक्कमही लंपास केली. या चोरीत चोरट्याने गायकवाड यांच्या घरून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली; मात्र त्यांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. हा चोर पाहणीतीलच असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.