लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ८९ हजार ८४२ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून सध्या तरी त्या धोक्यात असल्याचे चित्र आहे.गत आठ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस सोमवारी काही भागात बरसला. तर निम्मा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यात अनेकांकडून पेरण्या आटोपल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, पाऊस आज येईल उद्या येईल या आशेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून आजच्या स्थितीत कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार २० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यातील बऱ्याच पेरण्या अंकुरल्या असून पावसाच्या गैरहजेरीमुळे त्या करपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.यंदाच्या खरीपात जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ७३८ हेक्टरवर पेरा होईल, असे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख २६ हजार ३६२ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले. तर १ लाख १७ हजार ६७५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे नियोजन आहे. तर उर्वरीत क्षेत्रात तूर, ज्वारी, मुंग व उडिदाचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या नियोजनानुसार शेतकऱ्यांकडून पेरण्या सुरू झाल्या असून कपाशीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर सोयाबीन आणि तुरीचा पेरा सध्या माघारल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या पेरण्या करण्याकरिता शेतकºयांना आणखी पावसाची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज फोलचगत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा कमी होईल असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र हे सारे अंदाज खोटे ठरत असल्याचे दिसून आले आहे. विशेषज्ञांच्या अंदाजाला बगल देत तब्बल ६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यातील काही भागात पावसाअभावी मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी कपाशीलाच पसंती दिल्याचे दिसून आले.सोयाबीनच्या पेरणीकरिता पावसाची प्रतीक्षाकापूस उत्पादक असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बरेच शेतकरी सोयाबीन घेत आहे. ९० दिवसाचे पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनच्या पेऱ्याला आणखी पावसाची गरज असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. असे असतानाही ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आजघडीला १६ हजार २९२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.या दोन्ही वाणाच्या तुलनेत तूर मात्र मागे पडली आहे. जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस आला नसल्याने साडेआठ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ १० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. येत्या दिवसात पाऊस आल्यास या सर्वच वाणाचा नियोजनानुसार पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे.
८९,८४२ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:30 AM
जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे.
ठळक मुद्दे६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशी तर १६ हजार २९२ क्षेत्रात सोयाबीनचा पेरा